पावसामुळे कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:17+5:302021-05-18T04:10:17+5:30
जळोची स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी बारामती : बारामती शहरात जळोची येथे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जात ...
जळोची स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी
बारामती : बारामती शहरात जळोची येथे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, नुकताच या परिसरात मोठा पाऊस झाला. त्यातून मृतांचा अंत्यविधी अपूर्ण राहण्याची भीती आहे. त्यामुळे स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी केली आहे.
शनिवारी (दि. १५) रात्री जळोची परिसरात पाऊस झाला, जळोची स्मशानातभूमीत कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात.आता पावसाळ्याचे दिवस आहेत.त्यामुळे हा विधी उघड्यावरती केला जातो. पाऊस पडल्यावर मृतांवर पूर्णपणे अंत्यसंस्कार होणार नाही. गेले कित्येक दिवस झाले ही स्मशानभूमीची तजवीज करावी, याची मागणी करीत आहोत. परंतु प्रशासन जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत आहे, लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी अथवा इतर ठिकाणी वर पत्रा शेड उभारण्याची व्यवस्था करावी नाही. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अॅड. सातकर यांनी दिला आहे.
————————————————
फोटोओळी—जळोची येथे स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी केली आहे.
१७०५२०२१ बारामती—०३
——————————————