ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 03:11 PM2021-01-08T15:11:51+5:302021-01-08T15:12:20+5:30

आसाम येथे कार्यरत असताना अल्पशा आजाराने निधन झाले.

Funeral of Jawan Sambhaji Rale of Khed taluka in a military crematorium | ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप

ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप

Next
ठळक मुद्देग्रामस्थांनी दिला साश्रु नयनांनी निरोप 

पाईट : भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान अमर रहे यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता. आसाम येथे कार्यरत असताना खेड तालुक्यातील कुरकुंडीच्या वीर जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय.३०)  या भारतमातेच्या सुपुत्राचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी साश्रु नयनांनी निरोप दिला.

कुरकुंडी येथील मुळ असलेले संभाजी ज्ञानेश्वर राळे हे लष्करात कार्यरत होते. आसाम येथे लष्करी सेवा बजावत असतांना आजारी असल्याने त्यांचा बुधवारी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने शुक्रवारी सकाळी लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावरून लष्कराच्या विशेष वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कुरकुंडी येथे नेण्यात आले. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. यानंतर फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनात त्यांची गावातून अंतयात्रा काढण्यात आली. त्याची सांगता राष्ट्रीय विद्यालया प्रांगणात झाली.

लष्करातर्फे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती.  सकाळी १० वाजता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते. बंदुकीच्या २१ फैरी झाडत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.  साश्रु नयनांनी शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे अमर रहे अशा घाेषणा देत त्यांना ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिला. 

 ------

Web Title: Funeral of Jawan Sambhaji Rale of Khed taluka in a military crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.