पुण्यात इंधन दरवाढीविरोधात गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 02:35 PM2022-03-28T14:35:26+5:302022-03-28T14:35:34+5:30

केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने निषेध आंदोलन

Funeral of gas cylinder against fuel price hike in pune ncp workers shaved their heads in protest | पुण्यात इंधन दरवाढीविरोधात गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

पुण्यात इंधन दरवाढीविरोधात गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

Next

पुणे : केंद्र सरकारच्या अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मध्ये दररोज वाढ होत असून, ही वाढ थांबावी या हेतूने पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत आपला निषेध नोंदवला. 

"दैनंदिन जीवन जगत असताना घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत. या वस्तूंचे दर वाढत राहिले तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे बजेट कोलमडते. गेल्या काही महिन्यात निवडणुका असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.

...हाच भाजपचा गेल्या ७ वर्षातील अजेंडा

''सर्वसामान्य नागरिकांवर ही भाववाढ लादत असताना केवळ देशातल्या काही बड्या उद्योगपतींना याचा फायदा होत असून, भारतीय जनता पार्टीला आपले हितसंबंधी उद्योगपती यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच केवळ सर्वसामान्य जनतेवर ती महागाई लादायची आणि उद्योगपतींची संपत्ती वाढवणे हाच भाजपचा गेल्या ७ वर्षातील अजेंडा राहिला आहे. परंतु जर देशातील जनतेची ही लूट थांबली नाही तर भविष्यात तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय मारले जाणार असून हा देश पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात येईल त्यामुळेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील जी जनतेची लूट चालवली आहे, ही लूट थांबवावी, यासाठी आजचे आंदोलन असून सर्वसामान्य नागरिकांनी यातून धडा शिकावा व पुन्हा भारतीय जनता पार्टीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही सत्तेत बसवु नये" , असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.'' 

Web Title: Funeral of gas cylinder against fuel price hike in pune ncp workers shaved their heads in protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.