सोपानमहाराज नामदास अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 01:40 PM2019-11-20T13:40:18+5:302019-11-20T13:42:44+5:30

सासवड दिवे घाटात अपघाती निधन 

Funeral on the Sopan Maharaj Namdas | सोपानमहाराज नामदास अनंतात विलीन

सोपानमहाराज नामदास अनंतात विलीन

googlenewsNext

आळंदी : संत नामदेवरायांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचे सासवड दिवे घाटात अपघाती निधन मंगळवारी (दि.१९) झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली. अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, महंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोपानमहाराज नामदास यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिवावर इंद्रायणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आळंदीवर शोककळा पसरली. राज्यातून आलेले भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी सोपानमहाराज नामदास यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विष्णू मंदिर येथे ठेवण्यात आले होते. अंत्यविधी पूर्वी मंदिर व ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. यावेळी नागरिक, भाविकांनी दर्शनास गर्दी केली. त्यांचे पार्थिवावर येथील इंद्रायणी नदी घाटावर शोकाकुल वातावरणात भाविक, वारकरी यांचे उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार संजय जगताप, माजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, माजी आमदार प्रकाश देवळे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, वारकरी फडकरी संघटनेचे माऊली महाराज जळगावकर, धोंडोपंतबाबा शिरवळकर, बाळासाहेब महाराज उखळीकर, राणू महाराज वासकर, नीलेश महाराज लोंढे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, बाळासाहेब महाराज शेवाळे, नरहरी महाराज चौधरी, रामभाऊ महाराज राऊत, संजयमहाराज घुंडरे, वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मारुती महाराज कुरेकर, तात्या महाराज कराडकर, मारुती महाराज कोकाटे, आळंदीतील वारकरी, भाविक, नामदेवरायांचे दिंडीतील मान्यवर, नामदास परिवार, शिष्य, गायक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
नामदेवरायांचे वंशज नामदास परिवार असून या परिवाराकडून आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी प्रसंगी कीर्तन सेवेची परंपरा आहे. सेवेसाठी तसेच आळंदी यात्रेला येण्यासाठी दिंडीचा प्रवास सुरू होता. नामदेवरायांची दिंडी आळंदीला येत असताना दिंडीला अपघात झाला.
 सोपानमहाराज नामदास (वय ३६) हे  वै. तुळशीदास महाराज नामदास यांचे चिरंजीव आहेत. ते संत नामदासमहाराज यांचे १७ वे वंशज असून ते बालपणापासून आळंदी वारीला येत आहेत. ते कीर्तन सेवेत नेहमी टाळाची सेवा देत असत. ते विवाहित असून केशव महाराज नामदास यांचे ते पुतणे होत.
 

Web Title: Funeral on the Sopan Maharaj Namdas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.