महापालिकेच्या नव्या इमारतीत फर्निचर, एसीचाच खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 02:26 AM2018-11-03T02:26:52+5:302018-11-03T02:27:21+5:30

शिल्लक कामांसाठी साडेबारा कोटींच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव

Furniture, AC spending in the new building of the municipal corporation | महापालिकेच्या नव्या इमारतीत फर्निचर, एसीचाच खर्च

महापालिकेच्या नव्या इमारतीत फर्निचर, एसीचाच खर्च

Next

पुणे : पाणीगळती व अन्य अनेक कारणामुळे गाजत असलेल्या महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचा खर्च आतापर्यंत तब्बल ५४ कोटींच्या घरात पोहोचला आहे. या इमारतीला बांधकामासाठी २६ कोटींचा खर्च झाला असून, सभागृह, पदाधिकाऱ्यांची कार्यालये, विविध समित्यांची कार्यालयांचे फर्निचर, वातानुकूलन यंत्रणा, लिफ्ट, प्रोजेक्टर यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. यामध्ये आता आणखी वाढ होणार असून, शिल्लक कामांसाठी निधी कमी पडत असल्याने प्रशासनाने शहरातील विकास कामांचा निधी कमी
करून तब्बल साडेबारा कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. येत्या सोमवारी
(दि. ५) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेली जागा कमी पडत असल्याने शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत नवीन विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्रांवर चार मजली इमारत बांधली आहे. या इमारतीसाठी २६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा खर्च वाढत वाढत ५४ कोटींवर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीत ७२ फूट व्यासाचे गोल घुमटाचे सभागृह आहे. या इमारतीमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते विविध पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये, तसेच समित्यांच्या अध्यक्षांची कार्यालये आहेत. यासाठी आवश्यक असलेले फर्निचर तसेच विद्युतविषयक कामे करण्यासाठी सुमारे २८ कोटींचा खर्च झाला आहे.

या इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवून कामाची वर्कआॅर्डर देण्यात आली होती. ही कामे पूर्ण झाली असून झालेल्या कामाचे बिल देण्यासाठी भवन विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे वर्गीकरणाद्वारे १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

असा झाला इतर खर्च
मुख्य सभागृह फर्निचर : १ कोटी ४ लाख
पदाधिकारी कार्यालय फर्निचर : २ कोटी ५० लाख
जीआरसी डोम आणि इतर कामे : ४ कोटी ६ लाख
डोम सुशोभीकरण, इतर कामे : १ कोटी ७३ लाख
फायर फायटिंग कामे : १ कोटी २४ लाख

Web Title: Furniture, AC spending in the new building of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.