फु कटच्या जागेतील फर्निचर दुरुस्ती बंद
By admin | Published: June 27, 2015 03:47 AM2015-06-27T03:47:59+5:302015-06-27T03:47:59+5:30
महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यार फ र्निचरचा पडलेला राडारोडा उचलण्यात आला आहे. लोकमतने ‘फुकटच्या जागेत फर्निचर दुरुस्ती’ असे वृत्त दि. २४ला दिले
पिंपरी : महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यार फ र्निचरचा पडलेला राडारोडा उचलण्यात आला आहे. लोकमतने ‘फुकटच्या जागेत फर्निचर दुरुस्ती’ असे वृत्त दि. २४ला दिले होते. यामध्ये ठेकेदारांचा फ ायदा होत आहे, याकडे अधिकारी पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या वृत्ताची दखल घेऊन संबंधितांनी फर्निचरचा राडारोडा काढला.
सध्या सुरू असलेले फर्निचरची किरकोळ दुरुस्ती संबंधित विभागातच सुरू आहे. लोकांची वर्दळ असणाऱ्या भागात हे काम सुरू असल्याने संबंधित विभागालाही फर्निचरच्या कामाचा त्रास होत होता. यामुळे फर्निचर बनविणाऱ्या कर्मचाऱ्याने दुसऱ्याच दिवशी सर्व कामकाज इतरत्र हलविले. सध्या महापालिकेत ठेकेदाराचे कर्मचारीच दिसून आले नाहीत. फर्निचरची होणारी किरकोळ दुरुस्तीही थांबविण्यात आली.
दरम्यान, या कामांवर गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधीचा निधी खर्च झाला आहे. त्यातून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यापुढे असे प्रकार झाल्यास संबंधितांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे. तसेच नवीन घेतलेल्या फर्निचरचा दर्जाही तपासण्यात यावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)