प्रभाग रचनेवरची स्थगिती उठल्यानंतरच फुरसुंगी व उरुळी देवाची नगर परीषद होणार - विजय शिवतारे

By राजू हिंगे | Published: November 22, 2023 07:45 PM2023-11-22T19:45:06+5:302023-11-22T19:45:26+5:30

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दाेन गावांप्रमाणे इतरही समाविष्ठ गावांत चुकीच्या पद्धतीने मिळकत कर आकारणी

Fursungi and Uruli Deva Nagar Parishad will be held only after the moratorium on ward formation is lifted | प्रभाग रचनेवरची स्थगिती उठल्यानंतरच फुरसुंगी व उरुळी देवाची नगर परीषद होणार - विजय शिवतारे

प्रभाग रचनेवरची स्थगिती उठल्यानंतरच फुरसुंगी व उरुळी देवाची नगर परीषद होणार - विजय शिवतारे

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेला सर्वाेच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठल्यानंतर फुरसुंगी अािण उरुळी देवाची या दाेन गावांची नगर परीषद निर्माण हाेईल असा दावा माजी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दाेन गावे वगळून त्यांची नगर परीषद स्थापन करण्याचा निर्णय काही महिन्यापुर्वी राज्य सरकारने घेतला हाेता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते यापार्श्वभुमीवर विजय शिवतारे म्हणाले , पालिका हद्दीत १९९७ साली समाविष्ठ केलेल्या गावांत विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे झाले नाहीत, २०१७ साली महापालिका हद्दीत समाविष्ठ केलेल्या अकरा गावांत अद्याप विकास कामे झाली नाही, त्यानंतर २०२१ साली महापालिका हद्दीत समाविष्ठ झालेल्या तेवीस गावांचा विकास आराखडा अद्याप झालेला नाही. यामुळे या गावांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला याकडे शिवतारे यांनी लक्ष वेधले.

मिळकत कराच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारणी केली जाणार नाही

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दाेन गावांप्रमाणे इतरही समाविष्ठ गावांत चुकीच्या पद्धतीने मिळकत कर आकारणी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या कालावधीत भराव्या लागणाऱ्या मिळकत करापेक्षा पालिकेच्या हद्दीत पाच पट अधिक मिळकत कर भरावा लागत आहे. यामुळे नागरीकांचा राेष वाढला आहे. समाविष्ठ गावांतील मिळकतींना ग्रामपंचायतीच्या कालावधीतील मिळकत कराच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारणी केली जाणार नाही असा निर्णय झाला आहे. या गावांतील विकास कामाकरीता मी राज्य सरकारकडून निधी महापालिकेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही विजय शिवतारे यांनी सांगितले.

Web Title: Fursungi and Uruli Deva Nagar Parishad will be held only after the moratorium on ward formation is lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.