भावी सैन्यदल अधिकाऱ्यांचा कोरोनाशी लढा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:16+5:302021-05-30T04:10:16+5:30

पुणे : शालेय आणि महाविद्यालयातील जीवनातच सैन्यदलाचे प्रशिक्षण घेत उद्याचे सैन्य अधिकारी बनू पाहणाऱ्या एनसीसीच्या छात्रांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत ...

Future military officers continue to fight Corona | भावी सैन्यदल अधिकाऱ्यांचा कोरोनाशी लढा सुरू

भावी सैन्यदल अधिकाऱ्यांचा कोरोनाशी लढा सुरू

Next

पुणे : शालेय आणि महाविद्यालयातील जीवनातच सैन्यदलाचे प्रशिक्षण घेत उद्याचे सैन्य अधिकारी बनू पाहणाऱ्या एनसीसीच्या छात्रांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत आता हिरिरीने सहभाग नोंदविला आहे. सध्या पिंपरी-चिंचवड येथील दहा लसीकरण केंद्रांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी एनसीसीच्या छात्रांची मदत घेण्यात आली असून, विविध केंद्रांवर तब्बल दोनशे छात्र नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.

याबाबत माहिती देताना पुणे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर सुनील लिमेय म्हणाले की, कोरोनाशी लढण्याकरिता डाॅक्टर, पोलीस, सफाई विभागाचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या पातळीवर लढत असताना एनसीसीसारख्या संरक्षण दलाशी निगडित असलेला विभागानेही यामध्ये आपली जबाबदारी निभावण्यास सुरुवात केली आहे. एनसीसीच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर पुणे विभागातील दोनशे छात्र नियुक्त करण्यात आले आहेत. लसींचा तुटवडा आणि लसीकरणासाठी केंद्रावर येणाऱ्या नागरिकांची गर्दी यामुळे सध्या अनेक केंद्रावर प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये अनेक वाद होत आहेत. प्रशासन व पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी एनसीसीचे छात्र येथे बंदोबस्तासाठी तैनात झालेले आहेत.

सर्व विद्यार्थ्यांना कर्नल विनायक चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे. छात्र लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर आणि पुन्हा घरी परतल्यानंतरचे त्यांचे रिपोर्टिंग चव्हाण यांच्याकडे दररोज सुरू असते. शिवाय छात्रांमध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणे, ऑक्सिजन लेव्हल आदींबाबतसुद्धा रोजच्या रोज नोंदविल्या जात आहेत.

---

कोट १

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी लसीकरण केंद्रांवरील पोलीस व प्रशासनाच्या मदतीसाठी एनसीसीची मदत घेण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्याबाबतचे पत्रही त्यांनी एनसीसी ग्रुप कमांडरला पाठविले होते. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर परवानगी घेण्यात आली. ज्या छात्रांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्या पालकांचे लेखी संमतिपत्रही घेण्यात आले. त्यांना केंद्रावर मास्क, सॅनिटायझर्स पुरविण्यात आले आहेत.

-सुनील लिमये, ग्रुप कमांडर,पुणे

--

कोट २

१९ एप्रिलपासून आम्ही लसीकरण केंद्रावर जात आहोत. सकाळी साडेआठपासून सायंकाळी पाचपर्यंत तिथे थांबतो. लसीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसतो. त्यामुळे येणाऱ्यांची गर्दी मोठी असते. आलेल्या नागरिकांना सन्मानाने, आपुलकीने लसीकरणाबाबत माहिती देणे, कोरोनाच्या बचावासाठी काय दक्षता घ्यावी, आदींबाबत आम्ही लोकांमध्ये प्रबोधन करत आहोत. केवळ १८ वर्षांचे असताना आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

अभिनव सिंग, एनसीसी कॅडेट, सिम्बायोसिस महाविद्यालय

--

फोटो क्रमांक २९ पुणे : लसीकरण केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले एनसीसी छात्र.

===Photopath===

290521\29pun_6_29052021_6.jpg

===Caption===

फोटो क्रमांक २९ पुणे : लसीकरण केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले एनसीसी छात्र

Web Title: Future military officers continue to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.