गदिमा स्मारक : साहित्य जागराच्या आडून होणाऱ्या छुप्या आंदोलनाला माडगुळ्कर कुटुंबियाने दर्शविला विरोध:

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 09:36 AM2020-12-12T09:36:49+5:302020-12-12T14:16:03+5:30

साहित्य जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध

The Gadima Smarak Jan Andolan is not supported by the Madgulkar family | गदिमा स्मारक : साहित्य जागराच्या आडून होणाऱ्या छुप्या आंदोलनाला माडगुळ्कर कुटुंबियाने दर्शविला विरोध:

गदिमा स्मारक : साहित्य जागराच्या आडून होणाऱ्या छुप्या आंदोलनाला माडगुळ्कर कुटुंबियाने दर्शविला विरोध:

googlenewsNext
ठळक मुद्देगेली अनेक वर्षे माडगूळकर कुटुंबीय गदिमांच्या स्मारकासाठी झटत आहोत. अनेक प्रयत्न करूनही स्मारक होत नसल्यामुळे प्रदीप निफाडकर यांनी पुढाकार घेतलेल्या जन आंदोलनाच्या चळवळीला आम्ही पाठींबा दिला होता

पुणे: गदिमा स्मारक जनआंदोलनाचा पाठिंबा आम्ही माडगूळकर कुटुंबीय काढून घेत आहोत. गदिमांच्या साहित्याचा जागर करायला आमचा विरोध नाही. मात्र जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे', असे माडगूळकर कुटुंबियांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.याबाबतची माडगूळकर कुटुंबियांची भूमिका नुकतीच सुमित्र माडगूळकर यांनी एका जाहीर निवेदनातून प्रसिद्ध केली आहे.

गेली अनेक वर्षे गदिमा यांचे बहुचर्चित स्मारकाचे काम प्रलंबित आहे. त्यासाठी माडगुळकर कुटुंबीय अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अनेक प्रयत्न करूनही स्मारक होत नसल्यामुळे प्रदीप निफाडकर यांनी पुढाकार घेतलेल्या जन आंदोलनाच्या चळवळीला माडगुळकर परिवाराने पाठिंबा जाहीर केला होता.तसेच गदिमांचे स्मारक होण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते करण्याची तयारी दर्शवली होती. पण आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्याआधीच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क झाला होता व त्यांनी स्मारकासाठी सर्व तयारी झाली आहे व कोरोनामुळे यावर्षी आम्ही काही करू शकलो नाही असे ठाम मत व्यक्त केले. 

तेव्हा मी त्यांना विनंती केली की तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करावे.तेव्हा महापौरांनी आपण दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊ असे सांगितले.त्यानंतर आलेल्या आचारसंहितेमुळे महापौरांना जाहीर पत्रकार परिषद घेता आली नाही व त्यांचा माझा २० दिवस काहीही संपर्क झाला नाही.दरम्यान, महापौरांकडून काही संपर्क न झाल्यामुळे आम्ही आंदोलनात ओढले गेलो व आंदोलनाला पाठिंबा देण्याचा विचार आम्ही केला.आचारसंहिता संपल्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मला फोन करून पत्रकार परिषदेचे निमंत्रण दिले.त्यात मोहोळ यांनी गदिमा स्मारकाविषयी असलेल्या सर्व शंका दूर केल्या व स्मारकाचा पूर्ण आराखडा गदिमांच्या प्रतिभेला साजेसा बनवण्यात आला आहे हे पाहून समाधान व्यक्त करावेसे वाटले.

निवेदनात माडगूळकर कुटुंबीय म्हणाले, पुण्याच्या महापौरांनी एक महिन्याच्या आत गदिमा स्मारकाचे भूमिपूजन करू असा शब्द दिला आहे.  त्यांच्या शब्दाचा आदर करून आता हे आंदोलन न करता साहित्य जागर करावा असे निफाडकरांना सुचवले.मात्र त्यांचा एकूण कल हा आंदोलन पुढे चालू ठेवणे असाच दिसला. महापौरांनी ठाम आश्वासन देऊनही प्रशासन काहीच करत नाहीये असा दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न चालू आहे, असे आम्हाला लक्षात आले. गदिमांचा कोणीही स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करू नये अशी आमची भूमिका असल्यामुळे विनंती करूनही मागे घेण्यात न आलेल्या या आंदोलनाचा पाठिंबा आम्ही मागे घेत आहोत.

महापौर मुरलीधर मोहोळ,माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे व ते आमचा शब्द खाली पडू देणार नाहीत अशी खात्री वाटते. मात्र जबरदस्तीने चालू ठेवलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असणार नाही.त्यामुळे माडगूळकर कुटुंबियांसाठी अथवा गदिमा प्रेमापोटी कोणी या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर कृपया याबाबतीत पुनर्विचार करावा अशी नम्र विनंती करत असल्याचे देखील सुमित्र माडगुळकर यांनी नमूद केले आहे.

येत्या १४ डिसेंबर ला होणाऱ्या आंदोलनाला आम्ही कोणीही माडगूळकर कुटुंबीय उपस्थित राहणार नाही. या निर्णयामुळे गदिमा प्रेमींना काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. गदिमा स्मारक मार्गी लागणे हा उद्देश महापौरांच्या पुढाकाराने पूर्ण झाला आहे. त्यामुळे जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे या आंदोलनाशी आमचा कुठलाही संबंध राहणार नाही,गदिमा प्रेमी हे समजून घेतील अशी मी आशा करतो असे  माडगुळकर कुटुंबियांतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

.........................

माडगूळकर कुटुंबीयांना महापौरांनी आश्वासन दिले आहे ही खूप चांगली गोष्ट..

आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ' गीतरामायण'अजरामर करणारे ग.दि माडगूळकर यांची सोमवारी ( १४ डिसेंबर) ४३ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गदिमांच्या कवितांचे अभिवाचन केले जाणार आहे. यावर आम्ही ठाम आहोत. स्मारक होत नाही हे दुर्देव आहे. माडगूळकर कुटुंबीयांना महापौरांनी आश्वासन दिले आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आमचं काहीच म्हणणं नाही. महापौरांच्या शब्दावर त्यांचा विश्वास असेल तर ते व्हायला पाहिजे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.

- प्रदीप निफाडकर, प्रसिद्ध कवी

Web Title: The Gadima Smarak Jan Andolan is not supported by the Madgulkar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.