कलाकारांच्या उपस्थितीत रंगल्या गप्पाटप्पा
By admin | Published: May 28, 2015 12:38 AM2015-05-28T00:38:21+5:302015-05-28T00:38:21+5:30
जवळून पाहताना चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची मिळालेली संधी... अशा उत्साही वातावरणात सिनेमा गप्पाटप्पांचा कार्यक्रम चांगलाच रंगला.
पुणे : कलाकारांना पाहण्यासाठीची उत्सुकता , मोबाईलमध्ये कलाकारांची छबी टिपण्यासाठी सरसावलेले
कॅमेरे, त्यांना जवळून पाहताना चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची मिळालेली संधी... अशा उत्साही वातावरणात सिनेमा गप्पाटप्पांचा कार्यक्रम चांगलाच रंगला.
‘लोकमत सिनेमा’ व कुमार पॅसिफिक मॉल यांच्या सहकार्याने हा ‘सिनेमा गप्पाटप्पा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी चित्रपटातील महत्त्वाची भूमिका असणारे गणेश यादव, सारंग साठे, अर्चित देवधर व नीलेश नवलाखा उपस्थित होते.
दिग्दर्शक विवेक वाघ म्हणाले, ‘‘आजकाल प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य
हे खूप धकाधकीचे झाले आहे.
जो तो आपल्या कामात व्यस्त
झाल्याने सभोवताली काय चालले आहे याचे भानच कोणाला
राहिलेले नाही. अशाच प्रकारे आयुष्यातील पेचप्रसंगांची जाणीव करून देणारा ‘सिद्धांत’ हा
सिनेमा आयुष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करतो.
नात्याचे नवनवीन पदर हळूहळू उलगडत जातात. नात्यातील सगळ्यांना गुंफणारा धागा असतोे तो प्रेमाचा, विश्वासाचा, नात्याचा आणि तत्त्वांचा. ते या सिद्धांत चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. (प्रतिनिधी)
गणित या विषयात ज्याप्रमाणे आपण छोट्या-छोट्या सूत्रांचा वापर करून ते पद्धतशीर सोडवितो, त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबात आजोबा किं वा आजी या नात्यांकडे दुर्लक्ष न करता ते प्रेमाने आणि विश्वासाने कसे सांभाळावे हे या ‘सिद्धांत’ चित्रपटातून मांडले आहे. तसेच ‘लोकमत’च्या माध्यमातून हा चित्रपट नक्कीच यश मिळवून देईल, अशी अपेक्षा करतो.
- नीलेश नवलाखा
नेहमी मोक्याच्या वेळी येणारा, स्वत:ची गणितं कुटुंबाच्या मदतीने सोडवू पाहणारा, परंतु स्वत:च्याच समस्यांमध्ये अजून गुंतून पडलेला वक्रतुंड कसा मार्ग काढतो हे ‘सिद्धांत’ या चित्रपटात सुंदर पद्धतीने मांडलेल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
- सारंग साठे, अभिनेता
मुळातच गणिताचा कंटाळा असलेला अप्पा ठोसर यांच्या नातवाची भूमिका मी साकारत आहे. गणित आवडत नसल्याने कुटुंबात जे ताणतणाव निर्माण होतात त्या समस्यांचा तिढा वक्रतुंड मोठ्या भावाच्या मदतीने कसा सोडवतो हे ‘सिद्धांत’ या चित्रपटातून कळेल.
- अर्चित देवधर