गायकवाड खून प्रकरणाला कलाटणी

By Admin | Published: December 27, 2016 03:09 AM2016-12-27T03:09:26+5:302016-12-27T03:09:26+5:30

वडकी (ता. हवेली) येथे १९ डिसेंबर रोजी शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी, तळेवाडी) यांचा जमिनीचा वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी महाराष्ट्र केसरी

Gaikwad murdered murder case | गायकवाड खून प्रकरणाला कलाटणी

गायकवाड खून प्रकरणाला कलाटणी

googlenewsNext

लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथे १९ डिसेंबर रोजी शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी, तळेवाडी) यांचा जमिनीचा वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड याच्यासह आठ जणांनी कोयता, तलवार व लोखंडी सळयांचा वापर करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून गायकवाड यांच्या चुलतभावाने सुपारी देऊन घडवून आणला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने आणखी ३ जणांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मेघराज विलास वाहळे (वय २३, रा. भुकूम, खाटपेवाडी, ता. मुळशी), शंकर विजय भिलारे (वय २४, रा. कर्वेनगर साइबाबा मंदिरासमोर, पुणे, मूळ वरवडे, ता. आंबेगाव) दत्तात्रय महादेव पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे, ता. हवेली) या तिघांना अटक करण्यात आली असून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी अटक केलेले सहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड या पथकाची नेमणूक केली होती. हे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना खरे खुनी दुसरेच असल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी २५ डिसेंबरला मेघराज विलास वाहळे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाजी गायकवाड यांचा पुतण्या पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याने खुनाची सुपारी दिली होती व त्याने शिवाजी यांचा खून केल्यावर माझा भाऊ अनिल गायकवाड, उत्तम गायकवाड यांच्यासह १३ जणांनी ९ सप्टेंबर २०१५ रोजी हेमंत प्रकाश गायकवाड (वय ३२, रा. वडकी) याचा गोळ्या झाडून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली होती. याच्याविरुद्ध दाखल असलेल्या खुनाच्या मोका केसमधील साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊन मोक्याची केस ढिली होऊन त्याचे भाऊ जेलमधून सुटण्यास मदत होईल व त्याने वरील तिघांना ठराविक रक्कम देण्याचे कबूल करून काही आगाऊ रक्कम दिली. यानंतर पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याच्या सांगण्यावरून शिवाजी दामोदर गायकवाड याच खून केला.
(वार्ताहर)

Web Title: Gaikwad murdered murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.