टेम्पो चोरीला गेल्याचा बनाव करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:46+5:302021-04-19T04:10:46+5:30
आव्हाळवाडी :टेम्पो चोरीला गेल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याला लोणीकंद तपास पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. त्याचेकडून तीन ...
आव्हाळवाडी :टेम्पो चोरीला गेल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याला लोणीकंद तपास पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. त्याचेकडून तीन लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
हरीश प्रसाद शर्मा (वय ३३, रा. धार, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास टेम्पोला भाडे मिळावे यासाठी हरीश शर्मा इंदापूर येथून वाघोली येथे टेम्पो (क्र. एमपी-४१ जीए०७२१) घेऊन आला. दरम्यान शर्मा हा वाघोली येथे टेम्पो घेऊन आल्यानंतर केसनंदकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला लावून जेवण करून कॅबीन झोपी गेला. त्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास टेम्पोला लॉक करून गेला. टॉयलेटवरून आल्यानंतर त्याठिकाणी टेम्पो नसल्यामुळे कोणीतरी टेम्पो नेला अशी तक्रार लोणीकंद पोलीस स्टेशनला दाखल केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तपास पथकाच्या वेगवेगळ्या टीम बनवून तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वेगवेगळे पथक तपास करत असताना दिनांक १७ एप्रिल रोजी पहाटे २ वाजेच्या तपास पथकाचे बाळासाहेब सकाटे व पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे यांना पुणे ते सोलापूर महामार्गावर एच.पी. पेट्रोलपंप जवळ रोडच्याकडेला गुन्ह्यातील टेम्पो लावलेला दिसून आला. सदर टेम्पोबाबतची खात्री करून टेम्पो ताब्यात घेतला. परंतु टेम्पो कुठेही सीसीटीव्ही फुटेजमधे आला नसल्याने तसेच फिर्यादीने सांगितलेल्या माहितीमध्ये तफावत येत असल्याने तपास पथकाचा फिर्यादी हरीश शर्मा याचे विरुद्ध संशय बळावला. फिर्यादी शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असताफिर्यादीच आरोपी असल्याचे उघड झाले.