येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणारे गजाआड; २ लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड

By नम्रता फडणीस | Published: August 13, 2024 05:58 PM2024-08-13T17:58:07+5:302024-08-13T17:58:23+5:30

पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावरील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून चोरट्याला पकडले

Gajaad who broke the donation box in Tarakeshwar temple in Yerawada; A gang that stole 2 lakhs cash from Gajaad | येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणारे गजाआड; २ लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड

येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणारे गजाआड; २ लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड

पुणे : येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रक्कम् चोरट्यांनी चोरुन् नेली होती. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनीपुणे-नगर रस्त्यावरील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आणि संशयित आरोपीला पकडून् चौकशी केल्यानंतर् त्याने चोरीची कबुली दिली. या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून रक्कम्, दुचाकी असा एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

स्वरूप राजेश चोपडे (वय २१, रा. मांजरी, हडपसर), राजन पटेल, अक्षय शाहू, अथर्व वाटकर, अमित शिरीया (सर्व रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवड्यातील तारकेश्वर मंदिर पांडवकालीन आहे. मंदिरात दानपेट्या आहेत. मंदिराच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. ४ जून रोजी पहाटे चोरट्यांनी मंदिरातील सहा दानपेट्या फोडून दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. संशयित आरोपी स्वरूप चोपडेला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. आरोपी अथर्व वाटकरला नागपूरमधून अटक करण्यात आली.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक छगन कापसे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, प्रवीण खाटमोडे, अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Gajaad who broke the donation box in Tarakeshwar temple in Yerawada; A gang that stole 2 lakhs cash from Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.