गुंड गणेश रासकरवर गोळीबार करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:26+5:302021-07-28T04:12:26+5:30
नीरा (ता.पुरंदर) येथे कुख्यात गुंड गणेश रासकर याच्यावर त्याचाच जोडीदार गौरव लकडे याने गोळीबार करत खुन केला होता. गौरव ...
नीरा (ता.पुरंदर) येथे कुख्यात गुंड गणेश रासकर याच्यावर त्याचाच जोडीदार गौरव लकडे याने गोळीबार करत खुन केला होता. गौरव लकडेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना यापूर्वी अटक केली आहे. मुख्यआरोपी गौरव लकडे तब्बल दहा दिवस पोलिसांना गुंगारा देत होता.
फलटण तालुक्यातील मिरेवाडीतील शिवारात उसामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेजुरी पोलिसांनी सोमवारी (दि २६) रात्री १० च्या सुमारास उसाच्या शेताला घेराव करत गौरव लकडेच्या मुसक्या आवळल्या.
जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी नीरा येथे पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार नीरा शहरातील पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर १६ जुलैला सायंकाळी येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून एकेकाळी त्याचाच साथीदार असणारा गौरव लकडे याने त्याचा साथीदार निखिल ढावरे सोबत रासकर यांच्या डोक्यावर गोळीबार करून खुन केला होता. पोलिसांनी ३६ तासात निखिल ढावरे तसेच कटामध्ये सामील असणारा गणेश जाधव व आरोपीला पिस्तूल व काडतूस विकणारा संकेत उर्फ गोट्या सुरेश कदम यांना पोलिसांनी अटक केली होती.
तीघांच्या अटकेनंतरही मुख्य आरोपी गौरव लकडे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी सातारा, सांगली, पंढरपूर या ठिकाणी शोध घेतला. लकडे हा मिरेवाडी (ता.फलटण) गावातील शिवारात उसामध्ये लपून बसला होता. पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. आरोपी लकडेला अटक करून मा. न्यायाधीश पाटील मॅडम यांच्यासमोर हजर केले असता, आरोपी लकडेला दि. ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कोट
आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल व मॅक्झिन त्याच्या शेतातील जुन्या घरात लपवून ठेवले होते, ते पोलिसांना लकडे याने काढून दिले. हे हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. यामध्ये आणखी कुणाची सहभाग आहे का ? याची चाचपणी करत आहेत. या आरोपींच्या मदतीने पिस्तूल सप्लाय करणारे मुख्य आरोपीपर्यंत पोलिस पोहोचणार आहेत.
- सुनील महाडीक, पोलीस निरीक्षक जेजुरी