मुस्लिम कलाकारांनी साकारला 'गजमहल'; हसबनीस बखळ गणेशोत्सव मंडळाचे १३१ वे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:34 PM2024-09-03T15:34:42+5:302024-09-03T15:35:36+5:30

गणेशोत्सव हा समाजातील सगळ्यांचा उत्सव असून मुस्लिम गणेशभक्तदेखील उत्साहात सहभागी होऊन त्यांची सेवा देतात

Gajmahal created by Muslim artists 131st year of Hasbanis Bakhal Ganeshotsav Mandal | मुस्लिम कलाकारांनी साकारला 'गजमहल'; हसबनीस बखळ गणेशोत्सव मंडळाचे १३१ वे वर्ष

मुस्लिम कलाकारांनी साकारला 'गजमहल'; हसबनीस बखळ गणेशोत्सव मंडळाचे १३१ वे वर्ष

पुणे: ‘लोकमान्य टिळकांनी बसविलेला सातवा गणपती’ अशी ओळख असलेले शनिवार पेठेतील हसबनीस बखळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा १३१ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. मंडळ यंदा भव्य गजमहल साकारणार असून, या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम कलाकार सलमान शेख हे गणरायाचा 'गजमहल' साकारत आहेत.

गजमहल देखावा ४० बाय २० रुंद आणि उंच २० फूट उंच आहे. सलमान शेख सध्या आंबेगाव येथे देखाव्याचे काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव महाविद्यालयाचे १५ विद्यार्थी सजावटीचे काम करत आहेत. मागील चार वर्षांपासून शेख हे मंडळाचे सजावटीचे काम करत असून, प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी अभिनव महाविद्यालयात शिक्षण घेऊन व्यवसाय उभा केला आहे.

रणजित ढगे पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणेने स्थापन झालेले मंडळ ही हसबनीस बखळ मंडळाची विशेष ओळख आहे. हे मंडळ स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी लोकांनी एकत्र येण्याचे शनिवार पेठेतील महत्त्वाचे केंद्र होते. मामासाहेब हसबनीस यांच्या पुढाकाराने सन १८९४ मध्ये लक्ष्मणराव जावळे व लोकमान्य टिळक यांच्या हस्ते मंडळाची स्थापना झाली.

रणजित ढगे-पाटील म्हणाले, गणेशोत्सव हा समाजातील सगळ्यांचा उत्सव आहे. उत्सवात मुस्लिम गणेशभक्तदेखील उत्साहात सहभागी होऊन त्यांची सेवा देतात. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. तीच विचारसरणी अनुसरत मंडळ पुण्याच्या गणेशोत्सवात आपली वेगळी ओळख जपत आहे.

Web Title: Gajmahal created by Muslim artists 131st year of Hasbanis Bakhal Ganeshotsav Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.