शिक्षकांअभावी शिक्षणाचा खेळखंडोबा

By admin | Published: March 18, 2017 04:38 AM2017-03-18T04:38:13+5:302017-03-18T04:38:13+5:30

‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. ८०३ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, बिंदूनामावली अद्याप पूर्ण

The game segment of education due to the absence of teachers | शिक्षकांअभावी शिक्षणाचा खेळखंडोबा

शिक्षकांअभावी शिक्षणाचा खेळखंडोबा

Next

- बापू बैलकर,  पुणे

‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. ८०३ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, बिंदूनामावली अद्याप पूर्ण न झाल्याने ना नवीन भरती होतेय ना समायोजन. मात्र, ग्रामविकास विभागाने आता ३१ मार्चपर्र्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही प्रक्रिया आजही इनप्रोसेसच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिक्षक नसल्याने दुर्गम तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
बिंदूनामावलीचे काम रखडल्याने गेली ४ वर्षे शिक्षकांचे समायोजन किंवा भरती करता येत नसल्याने जिल्ह्यात त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गेली अडीच वर्षे जिल्ह्यात रोस्टरचे काम सुरू आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून (प्राथमिक) सांगितले जात आहे.
जिल्हा परिषद स्थापनेपूर्वीचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने तेव्हाची माहिती देणार कशी, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. रोस्टर पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यात शिक्षकांचे समायोजन तसेच भरती करता येत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात फक्त प्राथमिक शिक्षकांची ८०३ पदे कमी आहेत.
यात मुळशी, वेल्हे, भोर या दुर्गम तालुक्यात शिक्षक नसल्याने एक शिक्षकी शाळा तर नेहमीच बंद असल्याचे चित्र आहे. येथील शिक्षक कामानिमित्त बाहेर गेले, की शाळेला सुट्टी. तर काही ठिकाणी विद्यार्थीच शाळा चालवत आहेत. ही परिस्थिती असल्याने तेथील गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे.
एकीकडे शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांच्या रोषाला जिल्हा परिषद प्रशासनाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे आंतरजिल्हा बदली व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी असे ४५० शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे वेटिंगवर आहेत. हे शिक्षक वारंवार आंदोलन, उपोषण करीत आमचे समायोजन करा अशी मागणी करीत आहेत. त्यांना रोस्टर पूर्ण झाल्यावर समायोजन करू, असे आश्वासन दिले जात आहे, त्यामुळे या शिक्षकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे. या अगोदर रोस्टर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत सहायक आयुक्त मागासवर्गीय कक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेने रोस्टर आजही सहायक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे सबमिट केले नाही. आठ दिवसांपासून निवड याद्या शिक्षण विभागाने
दिल्या आहेत. त्याचे तपासायचे काम आता कुठे सुरू झाले आहे. त्यामुळे गेली अडीच वर्षे शिक्षण विभाग काय करीत होता? असा प्रश्न आता ग्रामस्थ करीत आहेत.

ठराव करूनही भरती नाही...

- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर ५० टक्के पदे भरण्याचा ठराव करण्यात आला. तशी तयारीही शिक्षण विभागाने केली. मात्र, शिक्षण संचालनालयाने रोष्टर पूर्ण नसल्याने पदे भरता येणार नाहीत, असे कळविले. त्यामुळे ठराव करून पदे भरली गेली नाहीत.

तपासणीसाठी दोनच कर्मचारी
२३ हजार कार्यालयांचे काम एकाच विभागाकडे सहायक आयुक्त मागासवर्ग कक्षाकडे, पाच जिल्ह्यांतील सुमारे २३ हजार कार्यालयांच्या रोस्टर तपासणीचे काम असून, त्यांच्याकडे यासाठी मनुष्यबळाचीही कमतरता आहे. त्यामुळे महिन्याचा प्रोग्राम तयार करून दररोजचे येथील कामकाज सुरू आहे.

सहायक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांना आम्ही रोस्टर पूर्ण करून पुन्हा तपासण्यास दिले आहे. शासनाने ३१ मार्चपर्यंत ते पूर्ण करण्यास सांगितले असून, आमचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.
-दौलत देसाई , अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: The game segment of education due to the absence of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.