अनाथ, वंचितांनी बनविल्या गणेशमूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:37 AM2018-08-25T01:37:23+5:302018-08-25T01:38:19+5:30
मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी तसेच त्यांच्यावर बाल्यावस्थेत सुसंस्कार रुजावेत यासाठी गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.
पिंपरी : मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी तसेच त्यांच्यावर बाल्यावस्थेत सुसंस्कार रुजावेत यासाठी गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. राहुल ब्रह्मे स्मृती प्रतिष्ठान संचालित मातृसेवा विद्यामंदिर येथील वंचित व अनाथ विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क कार्यक्रम राबविण्यात आला.
गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना सर्व साहित्य पुरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक व सुंदर गणेश मूर्ती साकारल्या. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा मूल्यसंस्कार रूजवला गेला. पर्यावरण रक्षण तसेच संवर्धनाच्या आपल्या जबाबदारीची जाणीव ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात कार्यक्रमाची यशस्वीता सामावल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यामध्ये गगनगिरी विश्व फाउंडेशनचे पदाधिकारी व प्रशिक्षक गौरी सरोदे, शीतल नारखेडे, योगिता नारखेडे, प्रणाली चौधरी, भानूप्रिया पाटील यांनी मार्गदर्शन केले. बालसेवा विद्यामंदिरातील शिक्षिका नयना मावळे, जयश्री पाटील, दिया खाडे, शिल्पा कांबळे, ज्योती चौधरी, दीपाली साबळे, प्रियंका बोबाटे, प्राप्ती कोल्हे, रूपाली पैठणकर, अलका गुंजाळ, माधुरी मगदूम या शिक्षिकांनीही मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांमधील नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे म्हणाल्या. ‘‘फाउंडेशन असे विविध उपक्रम महिला व लहान मुलांसाठी राबवत असते.’’ पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक शाडू मातीचा गणपती बनविण्यात विद्यार्थी व शिक्षकांनी मूर्ती बनविण्यात उत्साह दाखविला. शाळेमध्ये ज्या गणेश मूर्ती बनविण्यात येतात तशी मोठी मूर्तीही फाउंडेशनच्या पदाधिकाºयांनी बनविली. त्याच मूर्तीची स्थापना शाळेमध्ये करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अशोक भंगाळे यांनी सहकार्य केले.