उंबरे सरपंचपदी गणेश खुटवड, तर उपसरपंचपदी वैशाली खुटवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:01+5:302021-02-15T04:12:01+5:30
या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गंगा खुटवड, रामचंद्र खुटवड, बाळासाहेब खुटवड, किशोरी खुडे, नंदा पवार उपस्थित होते. गणेश खुटवड ...
या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गंगा खुटवड, रामचंद्र खुटवड, बाळासाहेब खुटवड, किशोरी खुडे, नंदा पवार उपस्थित होते. गणेश खुटवड हे भोर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, तसेच सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्गसंवर्धन संस्थेचे महाराष्ट्राचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. या निवडीच्या वेळी ग्रामस्थांपैकी सुरेश खुटवड, शंकर खुटवड, दत्तात्रय खुडे, संपतराव खुटवड, बाजीराव खुटवड, दशरथ खुटवड, जालिंदर खुटवड, महादेव खुटवड, राजेंद्र खुटवड आदी मान्यवर उपस्थित होते.
उंबरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून तालुक्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आणणार असून शासनाच्या विविध योजना राष्ट्रवादीच्या माध्यमातून गावापर्यंत आणून राबविणार असल्याचे सरपंच गणेश खुटवड यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून विजय कोळी, तसेच ग्रामसेवक पोमण, तलाठी दिपक शिंदे यांनी काम पाहिले.
फोटो व ओळ : उंबरे (ता. भोर) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना गणेश खुटवड यांचे सहसदस्य व उंबरे ग्रामस्थ.