कोयाळी-भानोबा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश कोळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:11 AM2021-02-27T04:11:05+5:302021-02-27T04:11:05+5:30
दरम्यान सरपंचपदासाठी गणेश दत्तात्रय कोळेकर, वैशाली बापूसाहेब कोळेकर, अजय भानुदास टेंगले आणि रूपाली भानुदास आल्हाट यांचे तर उपसरपंचपदासाठी वंदना ...
दरम्यान सरपंचपदासाठी गणेश दत्तात्रय कोळेकर, वैशाली बापूसाहेब कोळेकर, अजय भानुदास टेंगले आणि रूपाली भानुदास आल्हाट यांचे तर उपसरपंचपदासाठी वंदना अनिल दिघे व राहुल भानुदास आल्हाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये वैशाली कोळेकर, अजय टेंगले व रूपाली आल्हाट यांनी सरपंचपदाचा तर राहुल आल्हाट यांनी उपसरपंच पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजय पडवळ व ग्रामसेवक शांताराम धेंडे यांनी गणेश कोळेकर यांची सरपंचपदी तर वंदना दिघे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित केली.
याप्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कोळेकर, माजी सरपंच बाळासाहेब येधुजी कोळेकर, गोरक्ष पोकळे, विठ्ठल कोळेकर, संजय दिघे, रघुनाथ भिवरे, मल्हारी शिंदे, पोपट कोळेकर, मोहन कोळेकर, नरहरी दिघे, माजी उपसरपंच विकास भिवरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश भाडळे, ऊर्मिला कोळेकर, सुनीता पांढरे, अलका कोळेकर, देविदास गायकवाड, रोहिदास सरवदे, सुरेश कोळेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून विजयी मिरवणूक काढण्यात आली. पदाच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याला प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे सरपंच व उपसरपंच निवडीनंतर जल्लोष करताना पदाधिकारी व ग्रामस्थ.