"अवघे विघ्ने नेसी विलया आधी वंदू तुज मोरया!पुण्यात बाप्पांच्या आगमनाने आनंद व चैतन्याची उधळण "

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:57 PM2020-08-22T14:57:25+5:302020-08-22T16:10:14+5:30

दुःख, कष्ट, यातना, संकटांना विसरून पुणेकर मंडळी गणेशोत्सवाला पुण्यात प्रारंभ..

Ganesh Mahotsav : The arrival of Ganpati Bappa in home at Pune with joy and happiness | "अवघे विघ्ने नेसी विलया आधी वंदू तुज मोरया!पुण्यात बाप्पांच्या आगमनाने आनंद व चैतन्याची उधळण "

"अवघे विघ्ने नेसी विलया आधी वंदू तुज मोरया!पुण्यात बाप्पांच्या आगमनाने आनंद व चैतन्याची उधळण "

Next
ठळक मुद्देमूर्ती, फुले, पत्री, फळे आदी पूजा सामग्री खरेदीसाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी

पुणे : पुणे शहराला गणेशोत्सवाची फार मोठी परंपरा लाभली आहे. दरवर्षी धुमधडाक्यात साजरा हॊणाऱ्या गणेश उत्सवाने जगभरात नावलौकिक मिळवला आहे.या उत्सवाशी पुणेकरांची वर्षानुवर्षे नाळ जोडली गेली आहे. वर्षभरात घडणारे सगळे दुःख, कष्ट, यातना, संकटांना विसरून पुणेकर मंडळी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यंदा कोरोनाचे संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावरील निर्बंधांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस व महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर गणपती बाप्पा मोरया या, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात शनिवारी ( दि. २२) घरोघरी बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.  

शनिवारी सर्वत्र गणेशोत्सवाला प्रारंभ होत असताना पुणे शहर देखील सकाळपासूनच भक्तिमय वातावरणाने अगदी भारावून गेले आहे.कोरोनामुळे अगदी बंदिस्त, स्तब्ध, कंटाळवाण्या आयुष्याला बाप्पांच्या आगमनामुळे मोठ्या आनंदाचे व चैतन्याचे स्वरूप प्राप्त झाले. शहरात घरोघरी आरोग्याची काळजी घेत लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. तसेच पुणे शहरातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरी वाडा या प्रसिद्ध मानाच्या गणपतींची देखील अगदी शांततापूर्ण व मोजक्याच लोकांच्या उपस्थित धार्मिक पद्धतीने दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानाच्या गणपतींची मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणि गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करत मंदिरातच श्रींच्या मूर्तींची स्थापना केली आहे. 

पुण्यात दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट आहे. परंतु, तरीदेखील शहरात सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होती. मूर्ती, फुले, पत्री, फळे आदी पूजा सामग्री खरेदीसाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.घरोघरी श्रींच्या आगमनाने प्रसन्नता अनुभवायला मिळत आहे.गणपती बाप्पांच्या आगमनाला शहरात सर्वत्र बाप्पांचा जयघोष,पूजेच्या भक्तिमय वातावरणाने एक वेगळाच रंग भरलेला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा या उत्सवाला काहीशा मर्यादा आल्या आहेत. कालच पुण्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी शांततापूर्ण,आणि विनागर्दी गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन करताना शहरातील मानाच्या सह कोणत्याही गणपतीच्या दर्शनाला परवानगी देता येणार नाही असे जाहीर केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच घरगुती स्वरूपात साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस व महापालिका प्रशासनाने केले आहे.

पण याही परिस्थितीत आपल्या लाडक्या बाप्पांच्या चरणी नतमस्तक होताना घरोघरी ''अवघे विघ्ने नेसी विलया आधी वंदू तुज मोरया या!'' या श्रद्धा भावाने प्रत्येकजण 'सुखकर्ता श्रीं'च्या सेवेत रुजू झाला आहे.   

Web Title: Ganesh Mahotsav : The arrival of Ganpati Bappa in home at Pune with joy and happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.