पुण्यातील केळकर रस्त्यावर मंडळाचा धांगडधिंगा; पोलिसांच्या सुचनेकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:02 PM2022-09-09T20:02:02+5:302022-09-09T20:18:16+5:30
पुण्यात विसर्जन मिरवणूक अतिशय धुमधडाक्यात सुरू आहे.
पुणे : पुण्यात विसर्जन मिरवणूक अतिशय धुमधडाक्यात सुरू आहे. लक्ष्मी, केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्याला उत्साह ओसंडून वाहत आहे. लाखोंच्या घरात नागरिक उत्सवात सहभागी झाले आहेत. त्यातच पुण्यातील केळकर रस्त्यावर असणाऱ्या सुरुवातीच्या मंडळाने मनमानी सुरू केली आहे. पोलीसांनी वारंवार पुढे जाण्याच्या सूचना देऊनही मंडळाचे कार्यकर्ते धांगडधिंगा करण्यात मग्न झाले आहेत. त्यामुळे केळकर रस्त्याची मागची मंडळे पूढे येऊ शकत नाहीयेत. आधीच विसर्जन मिरवणुकीला विलंब झाला असताना मंडळांचा मनमानी कारभार सुरू झाला आहे.
केळकर रस्त्याला डीजेचा दणदणाट सुरू आहे. असंख्य नागरिक मंडळांपुढे नाचत असल्याने मिरवणूक हळूहळू पूढे सरकत आहे. पुण्यातील यंदाची मिरवणूक इतिहास रचणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मिरवणूक दोन दिवस चालेल असा अंदाज लावला जात आहे.