गणेशा, कोरोनाची महामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:23+5:302021-09-21T04:13:23+5:30

बारामतीत गणेश भक्तांचे गणरायाला साकडे घालत निरोप बारामतीत गणेश भक्तांचे गणरायाला साकडे घालत निरोप बारामती : ‘ ...

Ganesha, the epidemic of corona | गणेशा, कोरोनाची महामारी

गणेशा, कोरोनाची महामारी

googlenewsNext

बारामतीत गणेश भक्तांचे

गणरायाला साकडे घालत निरोप

बारामतीत गणेश भक्तांचे गणरायाला साकडे घालत निरोप

बारामती : ‘ गणपती बाप्पा मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त मागणी करतानाच कोरोनाची महामारी लवकरात लवकर टळो, आणि पुढच्या वर्षी येताना वाजत गाजत आणायची संधी द्या असे साकडे घालत शहरातील सर्व गणेश भक्तांनी साश्रू नयनांनी गणरायाला निरोप दिला. शहरातील बारामती नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या २८ कृत्रिम जलकुंभाच्या ठिकाणी तसेच १२ फिरत्या रथातून गणेश मूर्तींचे संकलन केलेल्या ४ हजार ७५० गणेश मूर्तींचे शहर आणि परिसरातील दोन विहिरींमध्ये विसर्जन करण्यात आले.

रविवारी(दि १९) सकाळी साडेसात वाजता सुरू झालेला विसर्जन सोहळा रात्री दहा वाजता संपला. शहरातील गणेश भक्तांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत साधेपणाने लाडक्या श्री गणेशाचे विसर्जन केले.

प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील २५ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंभांसह खास विसर्जनाकरिता तयार केलेल्या १२ फिरत्या विसर्जन रथांची देखील व्यवस्था नगरपालिकेने केलेली होती. शहरामध्ये पूर्ण दिवस सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत एक पथक व दुपारी ३ ते विसर्जन संपेपर्यंत दुसरे पथक अशाप्रकारे २५ ठिकाणी एकूण ५० पथके नेमून दिली होती. त्याठिकाणी कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कलशांची सोय केलेली होती.

मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सकाळपासून सर्व मूर्ती संकलन केंद्रांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी करून वेळोवेळी सूचना करून नागरिकांशीही संवाद साधला. फिरत्या रथातून घरोघरी जात मूर्ती संकलन करण्यात आले.

संकलित केलेल्या मूर्ती शहरातील २ विहिरींमध्ये विसर्जित करण्याची सोय केलेली होती. त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येकी २ पथके नेमली होती. त्यांनी दिवसभरामध्ये सकाळी ७ ते मध्यरात्री विसर्जन संपेपर्यंत एकूण ४ हजार ७५० गणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन केले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध विसर्जन पार पाडले. नागरिकांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन पुढच्या वर्षी याहीपेक्षा सुंदर नियोजन करू असा मनोदय यावेळी मुख्याधिकारी रोकडे यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्याधिकारी रोकडे, उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे यांच्यासह आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष रोकडे आदींसह नगरपालिकेचे विविध खात्यांचे प्रमुख दिवसभर जलकुंभाच्या ठिकाणी होते. कर्मचाऱ्यांसह विसर्जन सोहळ्यावर लक्ष ठेवून होते. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

—————————————————

फोटो ओळी : बारामती शहरात खास विसर्जनाकरिता १२ फिरत्या विसर्जन रथांची निर्मिती करण्यात आली होती.

२००९२०२१-बारामती-१०

————————————————

फोटो ओळी—बारामती शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंभांची सोय करण्यात आली.

२००९२०२१-बारामती-११

——————————————

Web Title: Ganesha, the epidemic of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.