गणेश मूर्तिकाराकडून गणेशभक्तांना ५० बेलाची झाडे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:16+5:302021-09-17T04:14:16+5:30

पर्यावरणप्रेमी व गणेश मूर्तिकार असलेले बाबासाहेब जाधव यांचे आजोबा पूर्वी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवत होते, त्यांच्यानंतर ही कला त्यांच्या घरात ...

Ganesha sculptor presents 50 bela trees to Ganesha devotees | गणेश मूर्तिकाराकडून गणेशभक्तांना ५० बेलाची झाडे भेट

गणेश मूर्तिकाराकडून गणेशभक्तांना ५० बेलाची झाडे भेट

googlenewsNext

पर्यावरणप्रेमी व गणेश मूर्तिकार असलेले बाबासाहेब जाधव यांचे आजोबा पूर्वी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवत होते, त्यांच्यानंतर ही कला त्यांच्या घरात खंडित झाली होती. बाबासाहेब जाधव यांनी यावर्षीपासून पुन्हा गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली असून यावर्षी त्यांनी केवळ ५० गणेशमूर्ती बनवून त्यांची विक्री केली आहे. व्यवसाय म्हणून मी या कलेकडे पाहत नाही. एक आवड म्हणून मी ही कला जोपासत आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. माझ्याकडे गणेशमूर्ती घेणाऱ्या गणेशभक्तांना एक झाड भेट म्हणून देत आहे व पर्यावरणाविषयी जनजागृती करत आहे.पुढील काळात शाडूमातीच्याच गणेशमूर्ती घेण्यासाठी गणेशभक्तांना प्रवृत्त करणार असल्याचे बाबासाहेब जाधव यांनी सांगितले.

१६ खोडद

160921\20210915_215325.jpg

कॅप्शन - बोरी बुद्रुक येथील गणेश मूर्तीकार बाबासाहेब जाधव यांनी गणेश मूर्ती घेणाऱ्या भक्तांना बेलाचे झाड भेट दिले.

Web Title: Ganesha sculptor presents 50 bela trees to Ganesha devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.