‘ती’च्या गणपतीने स्त्रीशक्तीचा जागर
By admin | Published: September 13, 2016 01:31 AM2016-09-13T01:31:47+5:302016-09-13T01:31:47+5:30
’ती चा गणपती’ संकल्पनेतून झाला स्त्रीशक्तीचा जागर, सर्जनशीलतेचा साकारला नवा आविष्कार! ‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव
पुणे : ’ती चा गणपती’ संकल्पनेतून झाला स्त्रीशक्तीचा जागर, सर्जनशीलतेचा साकारला नवा आविष्कार! ‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव जास्तीत जास्त समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल टाकले आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या या चळवळीला बळ देण्यासाठी अमृता प्रशांत जगताप, अनुराधा शशिकांत शिंदे, बी. एन अष्टेकर ज्वेलर्सच्या डॉ. पूनम अष्टेकर, बी ज्वेलर्सच्या अमृता अष्टेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे, नगरसेविका कमल व्यवहारे आदी विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘ती’चा गणपतीला भेट दिली. विचारांना जागर करताना त्यास कृतिशीलतेची जोड दिल्याने सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले.
महिलांना आरतीचा मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, याचा आनंद व्यक्त करीत या उपक्रमाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात तिला योग्य मान मिळावा, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी रोटरी क्लब आॅफ इन्स्पिराच्या अध्यक्षा पीनल वानखेडे, सचिव स्मिता विखणकर, शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, नगरसेविका नंदा लोणकर, सुरेखा कवडे, शिक्षण मंडळ सदस्या मंजूश्री खर्डेकर,
पुणे ब्रँच आॅफ इन्स्टिट्यूट आॅफ सीएच्या अध्यक्षा रेखा धामणकर, संध्या योगेश टिळेकर, पूर्वा योगेश मुळीक,
डॉ. वैशाली कडूकर, पाटे डेव्हलपर्सच्या राजश्री वाणी,
तृप्ती पाटे, ज्योत्स्ना वाणी, मनीषा वाणी, प्रिया पाटे,
संगीता कोतकर, मधुरा पूरकर, ज्योती चितोडकर,
सुनीता चितोडकर, जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा संगीता पोकळे, ललिता मुछाल, विनीता गुंडेचा, माधुरी अभंग, अंकशास्त्रज्ञ मानसी काळे, स्वप्नशील आर्किटेक्चर फर्म पार्टनर उमा नामपूरकर, इंडियन
इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्मेटॉलॉजी ट्रायकॉलॉजी
अँड न्यूट्रिशियनच्या संचालिका श्रृती गिजरे, आयटीए परफॉर्मिंग आर्टस् पुणेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी मैथिली पागे, धनश्री देशपांडे, पल्लवी जोशी, श्वेता धोका, प्रियांका लोहे, प्रांजली थिटे, ऋता चितळे, रसिका दाते, पद्मा शहाणे, प्रिया आगाशे, रेखा धामणकर, नेहा फडके, अश्विनी जतकर, सीमा विटलाणी,
अमृता कुलकर्णी, स्नेहलता घन यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची
आरती करण्यात आली.
लोकमततर्फे आयोजिण्यात आलेल्या ‘ती’च्या गणपतीसारख्या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळत आहे. समाजात सर्वत्र असा उपक्रम राबवला गेल्यास स्त्रीशक्तीचा आदर होईल.
- अमृता अष्टेकर, संचालिका, बी ज्वेल्स
‘ती’चा गणपती ही संकल्पना केवळ महाराष्ट्रापुरती न राहता भारतभर पोहोचावी. समानतेचा मंत्र समाजात जाणे अत्यंत आवश्यक आहे. कृतिशीलतेतून लोकमतने हा संदेश पोहोचिवण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. - डॉ. पूनम अष्टेकर,
बी. एन. अष्टेकर ज्वेलर्स
गणपतीची प्रतिष्ठापना पुरुषाने तर गौरींची स्थापना स्त्रीने करावी, असा आपल्याकडे प्रघात पडला आहे. गणपतीची पूजा करण्याचा मान देऊन ‘लोकमत’ने स्त्रीशक्तीचा आदर केला आहे. ‘ती’चा गणपती या उपक्रमाने महिलांचे सक्षमीकरण होईल़- मंजूश्री खर्डेकर, सदस्य, शिक्षण मंडळ