लोणी मध्ये नियमांचे पालन करत गणेशाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:13 AM2021-09-11T04:13:17+5:302021-09-11T04:13:17+5:30
पूर्व हवेलीत लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत लहान मोठ्या मंडळांसह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात ...
पूर्व हवेलीत लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत लहान मोठ्या मंडळांसह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कडक निर्बंध होते. यावर्षी कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याने शासनाने नियम शिथिल करून उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत एकूण १२७ सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी आबालवृद्धांनी जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. राज्य सरकारने आवाहन केल्याप्रमाणे सकाळपासून अगदी साध्या पद्धतीने सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षीही श्रींच्या मूर्तीची उंची कमी असल्याने ४ फुटांच्या आत असणाऱ्या मूर्ती सार्वजनिक मंडळाने बसवल्या आहेत.
-----
फोटो क्रमांक : १० लोणी काळभोर मूर्ती खरेदी
फोटो - लोणी काळभोर येथे श्री मूर्ती खरेदीसाठी झालेली गर्दी.