विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 10:25 PM2018-09-23T22:25:22+5:302018-09-23T22:25:56+5:30
त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र रात्र जागवत पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यावर्षी मात्र...
पुणे- पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कित्येक वर्ष चर्चा असते ती खास आकर्षण असलेल्या या गणपतींची.. त्यामुळे त्यांचा थाटही तसाच भाविकांचे नयन धन्य करणारा असतो. त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र जागवून पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती , भाऊ रंगारी, अखिल मंडई शारदा गजानन, जिलब्या मारुती, बाबू गेनू मंडळाचा नवसाचा गणपती अशी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारे हे गणपती यावर्षी वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पोलिसांनी काही मंडळांना थांबवत या सर्व गणपतींना विसर्जन मिरवणुकीत जागा करुन दिली आहे. तसेच गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत या सर्व गणेश मंडळांना वेळेत सहभाागी करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे या मंडळांनी पोलिसांना सहकार्य करत वेळेआधीच लक्ष्मी रस्त्यावरव मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. यामुळे रात्री उशिरा या गणपतींना पाहण्याची सवय झालेल्या सर्व भक्तांना आश्चर्याचा धक्का बसला.
सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिलब्या मारुती सायंकाळी ७ वाजता बेलबाग चौकात हजर झाला. जवळपास तीन तास लवकर त्याचे आगमन तेथे झाले. बाबू गेनू ८ वाजता आणि भाऊ रंगारी सव्वा आठ वाजता बेलबाग चोकात आरुढ झाले. अखिल मंडईचा गणपती हा साधारण साडे नऊ वाजता मिरवणुक रस्त्यावर आला. श्रीमंत दगडूशेठ ज्याचे दर्शनासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते तो अंदाजे साडे दहाच्या सुमारास बेलबाग चोकात येण्याची शक्यता आहे.