नीरेतील गणेशोत्सव मंडळांनी एक नवा आदर्श निर्माण केला. : खा. सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:24+5:302021-09-15T04:15:24+5:30
नीरेत एक गाव एक गणेशोत्सव : ४८ गणेशोत्सव मंडळांचा एकच गणपती. नीरा : कोविड संसर्ग आणि पर्यावरण ...
नीरेत एक गाव एक गणेशोत्सव : ४८ गणेशोत्सव मंडळांचा एकच गणपती.
नीरा : कोविड संसर्ग आणि पर्यावरण यांची जबाबदारी घेत नीरा येथील युवकांनी एकत्रित येत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली हे स्तुत्य आहे. पर्यावरण व कोविड संसर्गाला यामुळे अटकाव होईल. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात अशी अभिनव संकल्पना राबवून नीरा शहराने जिल्ह्यासमोरच नाही तर राज्यासमोर एक नव आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
सोमवारी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदरच्या दौऱ्यावर होत्या. नीरा येथील कार्यकर्ता मेळाव्यानंतर नीरा पोलीस दूरक्षेत्रातील स्थापन केलेल्या एक गाव एक गणेशोत्सव येथे भेट देऊन सायंकाळची आरती केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे, पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूसाहेब माहुरकर, दत्ता चव्हाण, विराज काकडे, राजेश चव्हाण, सरपंच तेजश्री काकडे, प्रमोद काकडे, मंगेश ढमाळ, विष्णू गडदरे, नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा गावात ४८ गणेशोत्सव मंडळे आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळांनी एकच ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. तशाच पद्धतीने यावर्षीही एकच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सलग दुसऱ्या वर्षी अशी संकल्पना राबवणाऱ्या नीरा पोलीस व नीरेतील युवकांचे कौतुक जिल्हाभर होत आहे.
--
फोटो १४ नीरा गणेशोत्सव सुप्रिया सुळे
फोटोओळ : नीरा (ता. पुरंदर) येथील एक गाव एक गणेशोत्सवात आरती करताना खासदार सुप्रिया सुळे, सरपंच तेजश्री काकडे व मंडळाचे पदाधिकारी.