निरा विक्रेत्याला लुटणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:55+5:302020-12-03T04:19:55+5:30

सूरज गोरख क्षीरसागर (वय २२, रा. किष्किंधानगर, कोथरूड), अन्वर दिलावर मुलाणी (वय १९), ओंकार सुनील देडे (वय २०), गणेश ...

Gang arrested for robbing Nira vendor | निरा विक्रेत्याला लुटणाऱ्या टोळीला अटक

निरा विक्रेत्याला लुटणाऱ्या टोळीला अटक

Next

सूरज गोरख क्षीरसागर (वय २२, रा. किष्किंधानगर, कोथरूड), अन्वर दिलावर मुलाणी (वय १९), ओंकार सुनील देडे (वय २०), गणेश नाना कसबे (वय १८), अक्षय लक्ष्मण लोंढे (वय २०, तिघेही रा. लोकमान्य वसाहत, कोथरूड), स्वप्नील श्रीकांत भंडारी (वय २६, रा. केळेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नीलेश साहेबराव भंडारी (वय २५) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भंडारी यांचे पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनीमध्ये नीरा विक्रीचे छोटे दुकान आहे. रविवारी दुपारी साडेचार वाजता भंडारी हे त्यांच्या दुकानामध्ये होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीस "तू बाहेर ये'''''''' अशी धमकी देत शिवीगाळ व लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यात दिवसभरातील नीरा विक्रीचे जमा झालेले 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीस धमकी देऊन आरोपी तेथून पळून गेले.

सध्या निरा विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्याने चोरट्यांनी नियोजन करुन संबंधीत ठिकाणी दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने कोथरुड व परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामधील तांत्रिक माहिती, आरोपीच्या कपड्याच्या वर्णनावरुन चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर कोथरुडमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवुन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दोन कोयते, नीरा विक्रेत्याकडून जबरदस्तीने घेतलेले ७०० रुपये जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम शेटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Gang arrested for robbing Nira vendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.