पुण्यात टोळक्याचा रिक्षाचालकावर कोयत्याने वार; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:42 PM2023-02-16T12:42:21+5:302023-02-16T12:42:33+5:30

१२ जणांच्या टोळक्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला...

gang attacked a rickshaw puller with a spear in Pune; A case has been registered at Bharti University Police Station | पुण्यात टोळक्याचा रिक्षाचालकावर कोयत्याने वार; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात टोळक्याचा रिक्षाचालकावर कोयत्याने वार; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

धनकवडी (पुणे) : मोटार सायकलवरुन आलेल्या १२ जणांच्या टोळक्याने रिक्षाचालकावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सच्चाई माता पायथा परिसरात मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी दत्ता शिंदे (वय २३, रा. सच्चाई मातानगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी १२ जणांच्या टोळक्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. ते प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षा घेऊन कदम यांच्या पान टपरीसमोर थांबले होते. त्यावेळी चार दुचाकीवरुन आलेल्या बारा जणांच्या टोळक्याने फिर्यादी यांच्याकडे पाहून 'हाच तो हाच आहे तो'..असे म्हणत त्याचा पाठलाग करून पकडले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात, हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. 

दरम्यान या घटनेत प्रथमेश घाडगे (रा. संतोषनगर, कात्रज) यालाही मारहाण करुन गंभीर जखमी केले.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.

Web Title: gang attacked a rickshaw puller with a spear in Pune; A case has been registered at Bharti University Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.