बांबूच्या व्यापाऱ्याला लुटण्यासाठी आलेली टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:23+5:302021-06-10T04:08:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देवपूजेसाठी बांबूचा व्यापारी पहाटे येत असतो, त्याच्या दुकानात मोठी कॅश असल्याच्या माहितीवरून त्याला लुटण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देवपूजेसाठी बांबूचा व्यापारी पहाटे येत असतो, त्याच्या दुकानात मोठी कॅश असल्याच्या माहितीवरून त्याला लुटण्यासाठी आलेल्या टोळीला खडक पोलिसांनी अगोदरच कारवाई करून जेरबंद केले.
निखिल विश्वास थोरात (वय २३, रा. लोहियानगर), द्वारकाधीश बाबासाहेब पवार (वय २३), सुरेश रमेश भिसे (वय २०, दोघेही रा. गंजपेठ) , यश ऊर्फ आदित्य सुभाष लोंढे (रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ कोयते, मिरची पूड, नायलॉनची दोरी अशी शस्त्रे जप्त केली आहे.
याप्रकरणी, पोलीस अंमलदार सुनील वालकोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६ जणांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक केली असून, इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शिवमंदिर आणि अंबाबाई देवीच्या मंदिरालगत काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन कोयते, मिरची पूड, दोरी असा दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे अधिक तपास करीत आहेत.