मौजमजेसाठी वाहनचोरी करणारी टोळी गजाआड
By admin | Published: July 6, 2017 03:35 AM2017-07-06T03:35:10+5:302017-07-06T03:35:10+5:30
मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून १४ गुन्ह्यांतील १० लाख रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून १४ गुन्ह्यांतील १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्वप्निल ऊर्फ नन्या अंकुश मिसाळ (वय २०, रा. ई/१ गंगा आर्चिड, पिंगळेवस्ती मुंढवा, मूळ गाव श्रीगोंदा, जि. अहमदनगर), पॉल ऊर्फ बाबा राजू जॉन (वय २०, रा. लेन नं. ७, सातफुटी रोड, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव), अक्षय ऊर्फ जंगल्या राजू भालेराव (वय २०, रा. नलावडे बिल्डिंग, महादेव आळी, दापोडी गाव), रूपेश ऊर्फ बंटी राहुल आल्हाट (वय १९, रा. टाईन रेंजहिल्स, खडकी) व विधीसंघर्षित बालक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गंगा आर्चिड मुंढवा एस. कुमार वडेवालेसमोर पार्क केलेली दुचाकी ही गंगा आर्चिडमध्येच राहणाऱ्या नन्या ऊर्फ स्वप्निल मिसाळ व त्याच्या इतर मित्रांनी चोरी केली असून, त्यांच्याकडे एक चोरीची गाडी असल्याची माहिती मिळाली.
युनिट ५ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन टीम तयार करून सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर शहरातील हडपसर २, खडकी २, सांगवी १, पिंपरी १, दिघी १, कोंढवा १, स्वारगेट १, मुंढवा १, फरासखाना १ व रोहा रायगड १ असे वाहनचोरीसह मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ पानटपरी फोडी असे १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १४ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून, मालकांचा शोध सुरू आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, युवराज नांद्रे, पोलीस हवालदार माणिक पवार, लक्ष्मण शिंदे, संतोष मोहिते, प्रवीण शिंदे, सचिन घोलप, प्रदीप सुर्वे, सिद्धराम कोळी, अमजद पठाण, महेश वाघमारे, प्रवीण काळभोर, प्रमोद घाडगे, राजेश रणसिंग, गणेश बाजारे, नामदेव, अंकुश जोगदंडे, संजय दळवी यांनी ही कामगिरी केली.