पुण्यात टोळक्याकडून राडा, जल्लोषावेळी तरुणाला चाकूने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:09 IST2025-03-10T11:08:31+5:302025-03-10T11:09:41+5:30
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, काल सामन्याच्या जल्लोषावेळी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

पुण्यात टोळक्याकडून राडा, जल्लोषावेळी तरुणाला चाकूने मारहाण
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसापूर्वी एका तरुणाने येरवडा चौकात अश्लील वर्तन केल्याची बातमी समोर आली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तो पर्यंत आता एका तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्री भारताने सामना जिंकल्यानंतर एफसी रोडवर तरुणांनी मोठा जल्लोष केला. यावेळी काही तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार
जल्लोष दरम्यान टोळक्याकडून एका तरुणाला चाकूने मारहाण. पाच ते सहा जणांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाला चाकुने बेल्टने आणि दगडाने तरुणाला मारहाण केली आहे. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष सुरू होता. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन फटाके फोडून जल्लोष करत होते. तर काही ठिकाणी डिजेच्या तालावर लोक नाचत होते. तर दुसरीकडे एफसी रोडवर एका टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. चाकुने मारहाण केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.