बंद सदनिकेवर चोरट्यांचा डल्ला, रोकड, दागिणे असा १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 00:16 IST2025-03-24T00:16:06+5:302025-03-24T00:16:31+5:30

याप्रकरणी सागर माहोर (32, रा. संतोषनगर, कात्रज ) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

Gang of thieves steals cash, jewellery worth Rs 1 lakh 75 thousand from a locked flat | बंद सदनिकेवर चोरट्यांचा डल्ला, रोकड, दागिणे असा १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरी

बंद सदनिकेवर चोरट्यांचा डल्ला, रोकड, दागिणे असा १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरी

धनकवडी : संतोषनगर कात्रज येथील तिरुपती कॉलनी तील बंद सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी रोकड आणि दागिणे असा १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

याप्रकरणी सागर माहोर (32, रा. संतोषनगर, कात्रज ) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहोर हे संतोषनगर परिसरातील तिरुपती कॉलनीत राहायला आहेत. ते बाहेर गावी गेल्यामुळे १६ ते २१ मार्च पर्यंत त्यांची सदनिका बंद होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचा कडी कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. सदनिकेतील 73 हजारां ची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. 

गावाहून परत आल्यानंतर माहोर यांना घरात चोरी झाल्या चे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कळमकर करत आहेत.

Web Title: Gang of thieves steals cash, jewellery worth Rs 1 lakh 75 thousand from a locked flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.