खेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:16+5:302021-09-10T04:14:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावांत बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी धमकावून दोन ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावांत बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली असून, तीन आरोपी फरार झाले आहेत.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या घुमटकर, आकाश सुनील शिंदे, परेश माणिक ढमाले, अवधूत संतोष कनसे, साईनाथ मुळुक, सूरज सुनील रोडे (सर्व. रा चास, ता. खेड) यांना पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही सोन्या घुमटकर याने धमकी देऊन जबरदस्तीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत खेड पोलिसांनी सोन्या घुमटकर (वय २९), आकाश शिंदे (वय २१), सूरज रोडे (वय २४ ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. परेश ढमाले, अवधूत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा राणी घाटे करीत आहेत.