चोरट्यांची घरात घुसून दाम्पत्याला मारहाण

By admin | Published: January 5, 2015 12:21 AM2015-01-05T00:21:34+5:302015-01-05T00:21:34+5:30

दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश करून दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सोने व दुचाकी असा सुमारे ५० हजारांचा ऐवजही लुटला. ही घटना सुपे (बारामती) येथे शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली.

The gang robbed the couple and entered the house | चोरट्यांची घरात घुसून दाम्पत्याला मारहाण

चोरट्यांची घरात घुसून दाम्पत्याला मारहाण

Next

सुपे : दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश करून दाम्पत्यास बेदम मारहाण केली. सोने व दुचाकी असा सुमारे ५० हजारांचा ऐवजही लुटला. ही घटना सुपे (बारामती) येथे शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली.
बाबूराव मारुती हिरवे (वय ५५, रा. सुपे) आणि संगीता बाबूराव हिरवे (वय ४५) असे मारहाणीत जखमी झालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. या दोघांना जबर मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी बारामती येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव हिरवे यांची मुलगी मनिषा ही आई-वडीलांच्या खोलीत अभ्यास करीत होती. रात्री अभ्यास उरकल्यावर ती आई-वडीलांच्या खोलीचा दरवाजा ओढुन घेऊन झोपण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांना खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. या चोरट्यांनी जवळच्या शेजारील घरांना बाहेरुन कडी-कोयंडा लावून बाबुराव यांच्या खोलीत प्रवेश केला.
त्यानंतर चोरटयांनी हातात असलेल्या लोखंडी पट्टीने या दांपत्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. या जोडप्यास मारहाण करुन संगिताच्या गळयातील मंगळसुत्र आणि दुचाकी असा सुमारे ५० हजाराचा ऐवज घेवुन चोरटे पसार झाले. मात्र त्यांनी आणलेली नंबर नसलेली दुचाकी मोरगाव-सुपा रस्त्यावरील ख्रिश्चन बंगल्यानजीक मिळुन आली आहे. या मारहाणीत बाबुरावच्या तोंडाचा उजव्या जबडा तर पत्नीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. दोघांच्याही तोंडाला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर बारामती येथील डॉ. हिंगणे यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत.
घटनास्थळास बारामतीचे विभागीय पोलिस अशिकारी संभाजी कदम, वडगाव निंबाळकरचे सहाय्य्क पोलिस निरिक्षक सतिश शिंदे आदींनी भेट दिली. पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The gang robbed the couple and entered the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.