मळद येथे लूटमार करणारी टोळी गजाआड

By Admin | Published: September 25, 2015 01:17 AM2015-09-25T01:17:07+5:302015-09-25T01:17:07+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावर बुधवारी (दि. २३) मध्यरात्री गावठी पिस्तूलचा धाक दाखवून वाहनचालक व इतरांना बेदम मारहाण करून लूटमार केली.

Gang robbery in molasses | मळद येथे लूटमार करणारी टोळी गजाआड

मळद येथे लूटमार करणारी टोळी गजाआड

googlenewsNext

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गावर बुधवारी (दि. २३) मध्यरात्री गावठी पिस्तूलचा धाक दाखवून वाहनचालक व इतरांना बेदम मारहाण करून लूटमार केली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत यातील सर्व आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मळद (ता. दौंड) येथे ही घटना घडली होती. दौंड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तुषार बाळू येडे, अक्षय सुरेश होले, शुभम राजाराम थोरवडे, विष्णू मच्छिंद्र विटकर, सचिन संजय गिरमे, किरण शंकर अळगी,अविनाश किसन पवार, सुनील ज्ञानदेव भंडलकर (सर्व रा. कुरकुंभ व परिसर) या आठ आरोपींना दौंड आणि कुरकुंभ पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर दरोडा आणि जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री १.३0च्या सुमारास पाटस टोलनाक्यावर कारमधील (एमएच ४३ अ‍ेजे ५0२) आरोपींनी जीपमधील (एमएच १४ ईएम ९५९९) वाहकाशी वाद घातला. त्यानंतर यातील काही आरोपींनी कुरकुंभ येथील त्यांच्या साथीदारांना जीप अडविण्यास सांगितले. त्यानुसार पाठलाग करीत त्यांनी मळद येथील तलावाजवळ जीप अडविली.
गुलाब रामचंद्र शिंदे, नवल जालिंदर शिंदे, ज्ञानल विलास शिंदे (सर्व रा. रासे, ता. खेड) यांना जबर मारहाण करीत गाडीची तोडफोड केली. आणि गाडीतील ६ हजार ५00 रुपयांची रोख रकमेसह इतर ऐवज लंपास केला. त्यानंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे, यांच्यासह पंडित मांजरे, कच्चर शिंदे, अमोल भोसले, बापू मोहिते यांनी पाहणी केली.
पिकअपमधील वाहकाला व इतर साथीदारांना मारहाण करीत असताना आरोपींनी मारहाणीतील एक साथीदार सचिन गिरमे याचे नाव घेतले होते. हे नाव वाहनचालकांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सचिन गिरमे व त्याच्या सर्व साथीदारांचा सकाळी साडेसातपर्यंत शोधून त्यांना जेरबंद केले. (वार्ताहर)

Web Title: Gang robbery in molasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.