शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विद्युतपंप चोरी करणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:49 IST2025-01-10T18:49:27+5:302025-01-10T18:49:49+5:30
चोरीने हैराण झालेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा; ६ जणांना अटक; ३ लाख १६ हजारांचा मुददेमाल हस्तगत

शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विद्युतपंप चोरी करणारी टोळी गजाआड
बारामती - जिरायती भागात शेतातील विहीरीवरील विद्युतपंपाच्या चोरीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठा दिलासा मिळाला आहे. वडगाव निंबाळकर पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करीत या प्रकरणाची पाळेमुळे खणुन काढत पाणबुडी,विद्युतपंप चोरी प्रकरणात सराईत ६ गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हयातील एकुण ३ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड यांनी अधिक माहिती दिली.तालुक्यातील लोणीभापकर, सायंबाचीवाडी गावचे हददीतील शेतकरी यांचे शेतातील विहिरीतील विद्युतपंप चोरीचे प्रकार वाढीस लागल्याने शेतकरी वर्ग अस्वस`थ होता.शेतीचे नुकसान होण्याची भीती होती.या अनुशंगाने प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तौफीक मणेरी, भाउसाो मारकड यांनी गोपनीय माहीती काढत आरोनींची माहिती मिळविली.आरोपी ओंकार राजेश आरडे (वय २५), महेश दिलीप भापकर (वय - ३१)अमोल लहु कदम (वय - २८ ) निलेश दत्तात्रय मदने (वय - २८ )प्रथमेश जालिंदर कांबळे (वय २२ सर्वजण रा. लोणीभापकर ता. बारामती जि. पुणे )यांना ताब्यात घेवुन चौकशी केली. तसेच गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे वरील आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विद्युतपंप चोरी केलेचे कबुली दिली.तसेच आरोपी कालीदास शिवाजी भोसले (वय–४२ रा. लोणी भापकर) यास विक्री केलेची कबुली दिली. सर्व आरोनींना अटक करण्यात आली आहे.विद्युतपंप चोरीचे १७ गुन्हे उघड झाले आहेत. तसेच त्यांचेकडुन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.दरम्यान,चोरी उघड झाल्याने शेतकर्यांनी अप्पर पोलीस अधिकारी बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.राठोड,सहायक पोलीस निरीक्षक काळे यांना सन्मानित केले.
पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे,पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे,राहुल सुतार आदींनी या कारवाइत सहभाग घेतला.
अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी शेतकरी कुटुंबातील आहेत.सर्वजण गावातील मुले आहेत.त्यांनी गावातच चोरी केल्याने पोलीसांसमोर चोरीचा छडा लावणे मोठे आव्हान होते.मात्र, पोलीसांनी मोेठ्या शिताफीने हा गुन्हा उघड केला.त्यामुळे वडगांव निंबाळकर पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी १० हजारांचेबक्षीस जाहिर केले.