बोलण्यात गुंतवून साडेतेरा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:47+5:302021-05-20T04:10:47+5:30

त्यानुसार लोणी कंद पोलिसांत मोटारीमधील तीन ते चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 ...

A gang of thirteen and a half lakhs engaged in speech | बोलण्यात गुंतवून साडेतेरा लाखांचा गंडा

बोलण्यात गुंतवून साडेतेरा लाखांचा गंडा

Next

त्यानुसार लोणी कंद पोलिसांत मोटारीमधील तीन ते चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 एप्रिल रोजी पुणे-नगर रोडवरील वाघोलीतील उबाळेनगरच्या पंचशील स्टील दुकानासमोर ही घटना घडली होती.

याबाबत लोणी कंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नीरा येथे एका व्यावसायिकाकडे नोकरीला आहेत. त्यांच्या मालकाचा स्लायडिंगचा व्यवसाय आहे. ३० एप्रिलला त्यांच्या मालकाने सणसवाडी येथून माल आणण्यासाठी पैसे देऊन पाठविले होते. त्यानुसार ते माल आणण्यासाठी जात असताना वाघोलीतील उबाळेनगर परिसरात मोटारीतील तीन ते चार चोरट्यांनी त्यांना अडवित 'गाडीला कट का मारला, आमच्या गाडीचे नुकसान झाले असे म्हणत बोलण्यात गुंतविले व त्यांना आमच्या गाडीचे नुकसान झाल्याचे दाखविण्यासाठी पाठीमागे घेऊन गेले.

त्यावेळी आरोपींच्या साथीदारांनी संगनमत करून तक्रारदार यांच्या गाडीतील स्टेअरिंगच्या खाली पिशवीत ठेवलेले १३ लाख ५० हजार रुपयांची चोरी गेल्याचे निदर्शनास आले असे तक्रारीत सांगितले. तक्रारदार चालक मोटारीत आल्यानंतर त्यांना पैशाची बॅग दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली. पण, पैसे मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी मालकाला ही माहिती दिली. बारामती येथे गावी गेल्यानंतर मालकाच्या सांगवण्यावरून त्यांनी आता लोणी कंद पोलिसांत तक्रार दिली आहे.

या बाबतीत चार झोनचे डीसीपी पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोणी कंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व क्राईमचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सूरज गोरे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: A gang of thirteen and a half lakhs engaged in speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.