टोळीयुद्ध भडकले

By Admin | Published: November 30, 2014 12:20 AM2014-11-30T00:20:10+5:302014-11-30T00:20:10+5:30

मित्रच्या वडिलांचा अंत्यविधी उरकून वैकुंठ स्मशानभूमीमधून बाहेर पडलेल्या कुख्यात नीलेश घायवळ टोळीच्या तीन सराईत गुंडांवर मारणो टोळीने भरदिवसा गोळीबार केला.

The gang war broke out | टोळीयुद्ध भडकले

टोळीयुद्ध भडकले

googlenewsNext
पुणो : मित्रच्या वडिलांचा अंत्यविधी उरकून वैकुंठ स्मशानभूमीमधून बाहेर पडलेल्या कुख्यात नीलेश घायवळ टोळीच्या तीन सराईत गुंडांवर मारणो टोळीने भरदिवसा गोळीबार केला. दुचाकीवरून जात असताना या तिघांना मोटारीने धडक देऊन खाली पाडल्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या. स्मशानभूमीबाहेर असलेल्या परमार्थ निकेतन मंदिरामध्ये सत्संग सुरू असतानाच ही घटना घडली. पप्पू गावडेचा खून केल्यानंतर घायवळ टोळीवर दुसरा हल्ला करून मारणो टोळीने घायवळला दुसरा धक्का दिला आहे. या हल्ल्यात एका गुंडाचा मृत्यू झाला आहे.
अमोल हरी बधे (रा. हनुमाननगर), संतोष नागू कांबळे (रा. दत्तवाडी) आणि लखन लोखंडे अशी जखमींची नावे आहेत. गजा मारणो टोळीच्या आठ गुंडांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बधे याचा मृत्यू झाला असून, तो घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य होता. मित्र विशाल पडवळ याचे वडील विठ्ठल पडवळ यांच्या अंत्ययात्रेला हे तिघे जण आले होते. याची कुणकुण मारणो टोळीच्या गुंडांना लागली होती. वैकुंठ स्मशानभूमीबाहेर आरोपी दबा धरून बसलेले होते. वैकुंठाच्या दुस:या प्रवेशद्वाराच्या थोडय़ा अंतरावर एक मोटार उभी करण्यात आलेली होती. तर, पाठीमागील बाजूला दुचाकी लावण्यात आलेल्या होत्या. 
बधे, कांबळे आणि लोखंडे हे तिघेही मोटारसायकलवरून बाहेर पडल्यानंतर राजेंद्रनगरच्या दिशेने निघाले होते. परमार्थ निकेतनसमोरच मोटार आडवी घालून त्यांना खाली पाडण्यात आले. काही कळायच्या आतच या दोघांवर हल्ला करण्यात आला. जीव वाचवण्यासाठी उलटय़ा दिशेने पळत सुटलेल्या या तिघा जणांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी अडवले. पिस्तुलामधून बेछूट गोळीबार करण्यात आला. घटनास्थळावर दोन पुंगळ्या मिळून आल्या आहेत. बधे याला गोळ्या लागल्याचे परिमंडल एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी सांगितले. घटनास्थळावर हाताचे तुटलेले बोटही मिळून आले आहे. जखमींना रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी मोटारींसह पसार झाले. बधे याच्या डोक्यात गोळी लागली असून, एक गोळी कांबळेच्या कानाला चाटून गेली आहे. आरोपींनी एकूण चार गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त एम. बी. तांबडे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, राजेंद्र जोशी, पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे, एस. जे. पिंजण, सूर्यकांत कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिका:यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाच्या साह्याने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
याप्रकरणी गजानन मारणो, विकी बांदल, रूपेश मारणो, सागर रजपूत, बालाजी कदम, सागर डिंबळे, विशाल डिंबळे, निखिल दुबाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
 
1नीलेश घायवळ आणि गजा मारणो टोळीमध्ये टोळीयुद्ध भडकले आहे. दोन आठवडय़ांपूर्वीच घायवळ टोळीच्या पप्पू गावडेचा मारणो टोळीने लवळे येथे निर्घृण खून केला होता. त्यानंतर मारणो आणि त्याच्या टोळीतील आघाडीचे मोहरे भूमिगत झाले आहेत. 
 
2मारणोचा उजवा हात समजला जाणारा अतुल कुडले हा घटनास्थळापासून जवळच असलेल्या राजेंद्रनगर पीएमसी वसाहतीमध्ये राहण्यास आहे. त्यामुळे कुडलेच या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांना आरोपींची नावे समजली असून, ती नावे देण्यास मात्र नकार दिला.
 
3परमार्थनिकेतन मंदिरात घटना घडली त्या वेळी सत्संग सुरू होता. भजन सुरु असल्यामुळे मंदिरातील भाविकांना रस्त्यावर काय चालले आहे, याचा आवाजदेखील आला नाही. सत्संग सुटल्यावर बाहेर पडलेल्या नागरिकांना घटना समजल्यानंतर मात्र घाम फुटला होता. आनंदबाग सोसायटीच्या शांत परिसरात मात्र सर्वत्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले होते. 
 
4रस्त्यावरून जाणा:या काही तरुणांनी हा थरार प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांनी तेथून पळ काढला. रस्त्यावरून पळत जात असताना त्यांना बीट मार्शलवरील पोलीस भेटले. धापा टाकीत या तरुणांनी खून झाल्याची माहिती दिली. त्यानुसार बीट मार्शलवरील पोलीस कर्मचारी अनिल शेलार त्यांच्या सहका:यासह घटनास्थळी धावले. घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती देऊन मदत मागवली. दरम्यान, वैकुंठ स्मशानभूमीमधून बाहेर पडलेल्या लोकांनी जखमी झालेल्या तिघा जणांना रुग्णालयात हलवले.

 

Web Title: The gang war broke out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.