गंगाधामला जल्लोष
By admin | Published: April 26, 2017 04:01 AM2017-04-26T04:01:09+5:302017-04-26T04:01:09+5:30
सकाळचं कोवळं ऊन... डीजेचा ठेका... उत्साहाने भारलेले वातावरण... जल्लोष आणि नृत्य...‘लोकमत’च्या धमाल गल्लीतील ही धमाल मार्केट यार्ड
सकाळचं कोवळं ऊन... डीजेचा ठेका... उत्साहाने भारलेले वातावरण... जल्लोष आणि नृत्य...‘लोकमत’च्या धमाल गल्लीतील ही धमाल मार्केट यार्ड येथील गंगाधाम सोसायटीतील रहिवाशांनी अनुभवली. सापशिडीपासून अँग्री बर्ड्सपर्यंत, बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत, सायकलिंगपासून मोपेड राईडपर्यंत सर्व काही जल्लोषमय होते. इथे अवतरला होता सळसळता उत्साह, आनंद आणि बिनधास्तपणा... खळाळत्या जल्लोषाला रिमिक्स गाण्यांचा तडका नाचायला भाग पाडत होता.
लहानपणीच्या आठवणी जागवणाऱ्या सापशिडीच्या खेळात लहानग्यांपासून वृद्धांनीही हिरीरीने सहभाग घेतला. कार्यक्रमात अनेक लहान मुले, पालक व ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा सहभागी झाले होते. यातील वेगवेगळ्या खेळांमुळे लहान मुलांचे मनोरंजन झाले असून त्याचा आनंद पालकांनाही मिळत होता. धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्राफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, बँड परफॉर्मर्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश असून लहान मुलांसाठी अँग्री बर्ड्स, स्नेक्स अँड लॅडर, किड्स कॉर्नर, फेस पेंटिंग असे अनेक खेळ ठेवण्यात आले.
या उपक्रमात अनेकांनी भाग्यवान होण्याची स्पर्धा मिळवली आहे, त्यामध्ये चांदीची नाणी जिंकणे, सायकल चालविणे, पुणेरी पगडी घालणे, मेंदी काढणे या गोष्टी करायला मिळाल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रायोजक काकी खाकरा अँड फूड प्रॉडक्ट, ट्री हाऊस स्कूल, मॅपल, सायकल पार्टनर, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर रोझरी, सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर एच. पी. ज्वेलर्स होते. झुम्बासाठी राहिल चौहान, बॉलिवूड डान्ससाठी डान्स फ्लोअर स्टुडिओ व निखिल डान्स स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले. चेतन अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. योगासाठी साधना लेले, देवव्रत लेले, गायत्री पारसवार यांचे सहकार्य लाभले.