कुख्यात गुंड गजानन मारणे याची नागपूर कारागृहात रवानगी; तर निलेश घायवळ अमरावती कारागृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 01:10 AM2021-04-06T01:10:58+5:302021-04-06T01:11:05+5:30
भविष्यात देखील समाजास धोकादायक ठरणारे व्यक्ती, गुन्हेगारी टोळ्या आढळून आल्यास त्यांच्यावर पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे
पुणे : एमपीडीए कायद्याअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध असलेला कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. तर मोक्काच्या गुन्ह्यात असलेला गुंड निलेश घायवळ याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने आदेश दिले आहेत.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब जगताप यांनी केली.
भविष्यात देखील समाजास धोकादायक ठरणारे व्यक्ती, गुन्हेगारी टोळ्या आढळून आल्यास त्यांच्यावर पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य जनतेस गुन्हेगारी टोळयांपासून त्रास असल्यास त्यांनी निर्भीडपणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.