गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: साथीदारानेच घातल्या गोळ्या, व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:22 IST2024-01-06T13:19:56+5:302024-01-06T13:22:48+5:30
शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे...

गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: साथीदारानेच घातल्या गोळ्या, व्हिडिओ आला समोर
- किरण शिंदे
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भर दिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते. याचा शरद मोहोळला जरा सुद्धा सुगाव लागला नाही.
शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे. दहा वर्षांपूर्वी झालेले भांडण या खुनाचे कारण ठरले आहे. या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा वीस वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी आहे.
महिनाभरापूर्वीच आरोपींनी शरद मोहोळचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी तीन पिस्टल खरेदी केल्या. शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनी रेकी केली. त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा, कुठे जातो कुणाला भेटतो याची इत्यंभूत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवले. मुन्ना पोळेकर हा सतत शरद मोहोळच्या सोबत असायचा. त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता. या खुनाचा व्हिडिओ-
गुंड शरद मोहोळच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
— Lokmat (@lokmat) January 6, 2024
(या व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात)
शुक्रवारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोथरूडच्या सुतारदरा परिसरात ही घटना घडली. त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदारांनीच त्याला गोळ्या घातल्या. या संपूर्ण… pic.twitter.com/LA5yVlduO9