पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडाला नागपूरच्या जेलची हवा, MPDAअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

By नितीश गोवंडे | Published: January 12, 2024 06:33 PM2024-01-12T18:33:01+5:302024-01-12T18:33:32+5:30

कदम विरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत....

Gangster terrorizing Pune wanted in Nagpur Jail, action taken under MPDA | पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडाला नागपूरच्या जेलची हवा, MPDAअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडाला नागपूरच्या जेलची हवा, MPDAअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

पुणे : एनडीए रस्ता परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडाविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (२३, रा. शांतीबन सोसायटी, शिवणे, एनडीए रस्ता) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. कदम आणि त्याच्या साथीदारांनी गंभीर गुन्हे केले आहेत.

कदम विरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला होता.

पोलिस आयुक्तांकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठवण्यात आला. पोलिस आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर करून, कदम याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. कदम याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ८२ गुंडांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे.

Web Title: Gangster terrorizing Pune wanted in Nagpur Jail, action taken under MPDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.