Pune Crime: इंग्रजीत बोलून फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 13:50 IST2022-01-04T13:45:55+5:302022-01-04T13:50:03+5:30
राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात फिर्यादी घुमटकर असताना दोन इंग्रजीत बोलणारे भांबटे आले...

Pune Crime: इंग्रजीत बोलून फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांना गंडा
राजगुरुनगर: इंग्रजी भाषेत संभाषण करून फॉरेनर असल्याचे भासवून हातचलाखी करून दोन भाबट्यांनी मोबाईल शॉपी दुकानदाराला ४६ हजाराचा गंडा लावला आहे. याबाबत मोबाईल दुकानदार तुषार चंद्रकांत घुमटकर, (रा. समतानगर, माळीमळा, राजगुरूनगर ) यांनी खेड पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्ती विरोधी फसवणुक केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात फिर्यादी घुमटकर असताना दोन इंग्रजीत बोलणारे भांबटे आले. त्यांनी दुकानातुन कार्ड रिडर खरेदी करून तीस रुपये रोख दुकानदारास दिले. तसेच भांबट्यांनी त्यांचा जवळील शंभर व दोनशेच्या नोटा फिर्यादी दाखवून दोन हजार रुपये सुट्टे मागितले. इंग्रजीत बोलत असल्याने फॉरेनर असल्याचे फिर्यादी वाटले.
दोन हजाराची नोट नसल्याने फिर्यादीने विश्वासाने पाचशे रूपयाच्या नोटा असलेले पाकीट त्याचेकडे बघायला दिले असता, त्यानी पाकीटातील पाचशे रुपयाच्या ९२ नोटा दोन हजाराची नोट पाहण्याचा बहाना करून खालीवर करून हातचलाखी करून खिशात ठेवल्या. बाकीच्या गल्ल्यातील नोटा फिर्यादीच्या हातात गल्ल्यात ठेवायला देऊन ४६ हजाराची रक्कम हातोहात हातचलाखी करुन लांबवली. पुढील तपास खेड पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार संदिप कारभळ करित आहे.