बेल्हा येथे गणपती विसर्जन अत्यंत साध्या पद्धतीने, ना डिजेचा आवाज, ना ढोल-ताशांचा आवाज, ना बेंजोचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:13+5:302021-09-21T04:11:13+5:30
सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी असल्याने अतिशय साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ना डिजेचा आवाज, ना ढोल-ताशांचा ...
सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी असल्याने अतिशय साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ना डिजेचा आवाज, ना ढोल-ताशांचा आवाज, ना बेंजोचा आवाज, ना गुलालाचा वापर, ना फुलांच्या पाकळ्यांचा वापर, ना गोंधळ असे कुठेही दिसले नाही. कुठल्याही गावातील सार्वजनिक मंडळांनी बाप्पांची विसर्जन मोठी मिरवणूक काढली नव्हती. गणपती समोर कोणत्याही मंडळाने मोठा देखावा केलेला नव्हता. मंडळांनी पिकअप गाडीत गणपती घेऊन जाऊन गणपतींचे आपापल्या पद्धतीने विसर्जन केले. तसेच गावातील सार्वजनिक मंडळाच्या गणपतीबरोबर अनेक घरगुती लोकांनी गणपती दिले होते. तसेच घरगुती गणपती आपापल्या पद्धतीने नेऊन विसर्जन केले. विसर्जन घाटावर गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणा ऐकायला येत होत्या. विसर्जन सर्वत्र शांततेत झाले. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गोरक्ष हासे, एस. आय. भोसले, विकास गोसावी, काठमोरे व आदींनी प्रत्येक गावात जाऊन गर्दी होणार नाही यासाठी प्रयत्न केले.
200921\img-20210920-wa0065.jpg
??????(??.??????)????? ????? ?????????????? ??????? ?????? ???????? ??????? ??????? ???? ???.