वारूळवाडीत गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलचे सलग तिस-यांदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:57+5:302021-01-20T04:11:57+5:30
दरम्यान, या निवडणुकीत पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ यांचे पुतणे सतेज भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, कृषी ...
दरम्यान, या निवडणुकीत पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ यांचे पुतणे सतेज भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विपुल फुलसुंदर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे यांची स्नुषा प्रमिला पाटे या मातब्बर उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत ३ माजी सरपंच व २ विद्यमान सदस्य यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे.
संजय वारूळे, जालिंदर कोल्हे आणि जंगल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तिस-यांदा गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलद्वारे १६ उमेदवार या निवडणूक रिंगणात होते. तर प्रतिस्पर्धी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, माजी सरपंच आत्माराम संते, देवेंद्र बनकर, आशिष फुलसुंदर यांच्या नेतृत्वाखाली भागेष्वर ग्रामविकास पॅनल द्वारे १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सरळ व अटीतटीच्या लढतीत गणपीर बाबा पॅनेल चे एक जागा बिनविरोध होऊन उर्वरित १६ जागांपैकी नऊ जागांवर विजय मिळवित संजय वारूळे, जालिंदर कोल्हे यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. या निवडणुकीत वाॅर्ड क्र. ६ मधून जंगल कोल्हे यांनी ७७४ मते मिळवित सर्वाधिक ३४४ मताधिक्यांनी विजय मिळविला. तर त्या खालोखाल याच वार्ड मधील स्नेहल कांकरीया यांनी ६९२ मते मिळवित २२० माधिक्यांनी विजय मिळविला. तसेच वाॅर्ड क्र.१ मधून राजश्री काळे या १२ मताधिक्यांनी विजयी झाल्या. तर प्रमिला पाटे यांना अवघ्या ९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
गणपीरबाबा पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- वार्ड क्र.१ राजेंद्र मेहेर (४५१ मते), माया डांेगरे (३९१ मते), राजश्री काळे (३७९ मते), वाॅर्ड क्र.३ प्रकाश भालेकर (बिनविरोध), शुभांगी कानडे (३२२ मते), वाॅर्ड क्र.४ ज्योती संते (५८७ मते), किरण आल्हाट (५१५ मते), वाॅर्ड क्र.६ जंगल कोल्हे (७५४ मते), स्नेहल कांकरीया (६९२ मते), संगीता काळे (६५६ मते)
भागेश्वर ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे- वाॅर्ड क्र.२ देवेंद्र बनकर (४७८ मते), शाम दुधाणे (४८३ मते), वैशाली मेहेर (५०७ मते), वाॅर्ड क्र.४ आत्माराम संते (५०७ मते), वार्ड क्र.५ विनायक भुजबळ (५४० मते), रेखा फुलसुंदर (५३४ मते), सोनल अडसरे (५४६ मते)
पाच वर्षात केलेली विकासकामे व पारदर्शक कारभार यामुळे मतदारांनी गणपीर बाबा पॅनलच्या उमेदवारांना मोठया मताधिक्यांनी विजयी केले आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून सर्व सदस्यांना विश्वासात घेवून विकासकामांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वास गणपीर बाबा पॅनल प्रमुख संजय वारूळे यांनी व्यक्त केला.
फोटो - वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय वारूळे, जालिंदर कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १० जागा जिंकून सलग तिस-यांदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविल्यानंतर जलोश साजरा केला .