मुलीच्या एका फोनवर मदतीसाठी गॅरेज कर्मचाऱ्याने घेतली धाव; अन् पुढं घडलं असं काही... की 'तो जखमी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 02:13 PM2021-08-22T14:13:14+5:302021-08-22T14:13:22+5:30

मदतीला धावून गेलेल्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली

A garage staff rushed to the girl's phone for help; Something happened next ... that 'he was injured' | मुलीच्या एका फोनवर मदतीसाठी गॅरेज कर्मचाऱ्याने घेतली धाव; अन् पुढं घडलं असं काही... की 'तो जखमी'

मुलीच्या एका फोनवर मदतीसाठी गॅरेज कर्मचाऱ्याने घेतली धाव; अन् पुढं घडलं असं काही... की 'तो जखमी'

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाणीत कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड क्रॅक्चर

पुणे : वाटेत कोणाची गाडी बिघडली तर ती घेऊन येण्यासाठी नेहमीच गॅरेजमधील कर्मचारी जात असतातच. त्यात एखादी मुलगी अडचणीत असेल तर तिच्या मदतीसाठी धावणार्‍यांची संख्या कमी नसते. अशाच एका मुलीने गाडी बिघडल्याचे सांगितल्यावर मदतीला धावून गेलेल्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली. बोपदेव घाटात अर्ध्यावर एस वळणावर शुक्रवारी दुपारी २ वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी कासीम इस्माईल शेख (वय २३, रा. आश्रफ नगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मोहम्मद शेख, समीर शेख, फैज शेख, इम्रान शेख, इन्नू व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासीम शेख हे एका गॅरेजमध्ये काम करतात. मोहम्मद शेख व समीर शेख यांनी एका मुलीच्या मार्फत फोन केला व तिची अ‍ॅक्टीवा गाडी बंद पडली असून दुरुस्तीसाठी बोपदेव घाटात बोलावून घेतले. या फोनवरुन दिलेल्या ठिकाणी मदतीसाठी शेख गेले. त्यावेळी तेथे हे टोळके त्याची वाटच पहात होते.

मोहम्मद शेख हा कासीमला म्हणाला की ‘‘उस दिन मेरे को सळी से मारता क्या कितने दिन भागेगा़ आया ना अभी अब जाके बता’’ असे म्हणून त्याला बांबुने दोन्ही पायावर, उजवे हातावर, कमरेवर, डोक्यात मारुन जबर जखमी केले. या मारहाणीत त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड क्रॅक्चर झाले आहे. आरोपींनी जाताना त्याला ‘‘तू किधर कंप्लेट करेगा तो तेरे को गायब करेंगे’’ अशी धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: A garage staff rushed to the girl's phone for help; Something happened next ... that 'he was injured'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.