पुणे -नाशिक महामार्गालगत कचरा कुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:29 AM2020-12-04T04:29:02+5:302020-12-04T04:29:02+5:30
पुणे -नाशिक महामार्गावर भीमानदीच्या पुलालगत मोठ्या प्रमाणात ओला सुका कचरा, तसेच प्लॉटिकच्या कचरा टाकण्यात येत आहे. या महामार्गालगत असणारे ...
पुणे -नाशिक महामार्गावर भीमानदीच्या पुलालगत मोठ्या प्रमाणात ओला सुका कचरा, तसेच प्लॉटिकच्या कचरा टाकण्यात येत आहे. या महामार्गालगत असणारे हॉटेल व्यवसायिक, तसेच शहरातील नागरिक येऊन या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. काही कचरा भिमानदीतही टाकण्यात येतो. त्यामुळे भिमा नदीची गटारगंगा झाली आहे. मेलेल्या कोंबडया, खानवळीत कापण्यात आलेल्या कोंबडयांचे निर उपयोगी अवयव, हॉटेलमध्ये उरलेले अन्न, प्लॉटिक बाटल्या तसेच इतर कचरा या ठिकाणी बिनधास्तपणे टाकत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्गधी सुटली आहे. राजगुरुनगर शहरात प्रवेश करतानाच या कचऱ्याचे दर्शन प्रवाशी व वाहन चालकांना घडत आहे.टाकण्यात येत असणाऱ्या कचऱ्यावर कोणाचाही अंकुश नाही. कचऱ्याची दुर्गधी सुटून या ठिकाणी रोगराई होण्याची भिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रशासनाने अटकाव करावा अशी मागणी होत आहे.
फोटो
०२ राजगुरुनगर कचरा
पुणे -नाशिक महामार्गालगत टाकण्यात येत असलेला कचरा.