शिवणे पुलाजवळ कचरा डेपोला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:17+5:302021-04-21T04:10:17+5:30

नांदेडगाव : शिवणे पुलाजवळ असलेल्या कचरा डेपोला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. कचऱ्यामुळे आग भडकल्याने जवळच उभी असलेली कचरागाडी ...

Garbage depot fire near sewing bridge | शिवणे पुलाजवळ कचरा डेपोला आग

शिवणे पुलाजवळ कचरा डेपोला आग

Next

नांदेडगाव : शिवणे पुलाजवळ असलेल्या कचरा डेपोला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. कचऱ्यामुळे आग भडकल्याने जवळच उभी असलेली कचरागाडी जळाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेड गावाचा संपूर्ण सुका कचरा पुलाजवळ आणून टाकला जातो. कचऱ्याला आग लागल्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. आग विझवण्यासाठी नांदेड सिटी येथील ३ अग्निशमन गाड्यांची मदत घ्यावी लागली. शिवणे नांदेड पुलासंदर्भात अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही अद्याप पुलाचे काम झालेले नाही.

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कमी रहदारी होती. त्यामुळे धोका टळला. पूल आणि रस्ता लहान असून एका वेळी दोन मोठ्या गाड्याही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्यांनाही कसरत करावी लागली.

फोटो - नांदेड फायर

Web Title: Garbage depot fire near sewing bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.