कचरा कोंडी फुटणार ?
By admin | Published: February 21, 2015 10:41 PM2015-02-21T22:41:05+5:302015-02-21T22:41:05+5:30
गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत.
पुणे : गेल्या दिड महिन्यापासून शहरात निर्माण होणारा कचरा महापालिका शहरातच जिरवित आहे. मात्र, सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे जागाच नसल्याचे शहरात या कच-याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे आरोग्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने एक पाऊल मागे घेत हा सुका कचरा डेपोवर टाकण्यासाठी महापालिकेस परवानगी देण्यास ग्रामस्थांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार, उद्या ( रविवारी) सकाळी महापौरांसह महापालिकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ कचराडेपोची पाहणी करणार असून त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी दिली.
सुका कचरा टाकण्यासाठी शहरात जागाच नसल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील कचरा उलचने महापालिका प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी आज आढावा बैठक घेतली.या बैठकीस फुरसुंगी गावच्या ग्रामस्थांसह महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर तसेच पालिका प्रशासनाकडून गेल्या दिड महिन्यात करण्यात आलेल्या उपाय-योजनांची तसेच शासनाकडे प्रलंबित प्रश्नांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच महापालिकेने अनेक मागण्यापूर्ण केल्या असून उर्वरीत मागण्या राज्यशासनाच्या अख्त्यारीतील आहेत. तसेच शहरातील कच-याची स्थिती दिवसें दिवस गंभीर होत असल्याने ग्रामस्थांनी पालिकेस सहकार्य करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या नंतर , शहराची कचरा समस्या पाहता महापालिकेस कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी अनुकुलता दर्शविली आहे. त्या नुसार, उद्या सकाळी महापौरांसह पालिका अधिकारी कचरा कँपींग करण्यासाठी जागेची पाहणी ़डेपोवर जाऊन करणार असून त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून कचरा टाकण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.
वाढताहेत
कच-याचे ढीग
महापालिकेने कचरा उचलने बंद केल्याने शहरात कच-याचे ढीग वाढतच असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरातही प्रशासनाने सुमारे ६00 ते ७00 टन कचरा उचलला नसल्याने शहरात पडून असलेला कचरा चार ते पाच हजार टनांपर्यंत पोहचला आहे. त्यातच उद्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास नकार दिल्यास येत्या काही दिवसात संपूर्ण शहर कच-याखाली जाण्याची भिती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली
जात आहे.